एक्स्प्लोर

शरद पवार गटाचा जागांचा आकडा ठरला? स्ट्राईक रेटवर देणार भर, पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत काय ठरलं?

जागा वाटपात मोठा आकडा पदरात पाडून घेण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुन्हा एकदा स्ट्राईक रेट वर भर आहे.

NCP Sharad Chandra Pawar Party : जागा वाटपात मोठा आकडा पदरात पाडून घेण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुन्हा एकदा स्ट्राईक रेट वर भर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 85 वर चर्चा झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

बैठकीत नेमकं काय घडलं?

आजच्या आज जागा वाटप सोडवून उमेदवारांना तत्काळ तयारीसाठी वेळ देण्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना शरद पवारांनी सूचना दिल्या आहेत. पक्षाने पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने जागा घेतल्याची बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. पार्लमेंट्री बोर्डाच्या मीटिंगनंतर आता पक्षाच्या सर्व खासदारांसोबत शरद पवारांची बैठक सुरु झाली आहे.  या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जबादाऱ्यांचं वाटप करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 58 उमेदवार निश्चित

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 58 उमेदवार निश्चित झाले आहेत. या 58 उमेदवारांमध्ये अद्याप अल्पसंख्यांक समुदायाचा एकही उमेदवार नाही.लोकसभेला अल्पसंख्यांक समुदायाने महाविकास आघाडीच्या पदरात भरभरून मतदान केल्याने अल्पसंख्यांक समुदायाला संधी मिळावी अशी शरद पवार पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. सध्या उमेदवार निश्चित झालेल्या 58 विधानसभा मतदारसंघात अणुशक्ती नगर विधानसभेचा समावेश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजूनही पक्षांतर्गत 27 उमेदवार निश्चित होणे बाकी असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. 

उद्या महाविकास आघाडीच्या 100 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता

आज रात्री महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रित उमेदवार जाहीर करणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या उमेदवार जाहीर करणार याबाबत निर्णय होणार आहे. जर महाविकास आघाडी म्हणून निर्णय झाला तर उद्या महाविकास आघाडीच्या 100 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबतचा निर्णय आज रात्री महाविकास आघाडी घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रावादी काँग्रेस 85 जागांवर लढण्याची शक्यता आहे. अद्याप काही जागांवर चर्चा सुरु आहे. पुढच्या दोन दिवसात जागावाटपाच्या मुद्यावर तोडगा निघेल असी माहिती नेत्यांनी दिली आहे. दरम्यान, उद्या महाविकास आघाडीकडून ज्या जागांवर एकमत जालं आहे, त्याठिकाणच्या उमेदवारांची ङोषणा होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या:

मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
Rupali Patil Thombare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
राष्ट्रवादीच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
Ambadas Danve on Ajit Pawar : अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा
Shivaji Sawant BJP : शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश का रखडला? कारण काय? ABP Majha
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं
Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मृतदेह सापडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
Rupali Patil Thombare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
राष्ट्रवादीच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
Marriage Letter to Sharad Pawar: अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Embed widget