ST Strike NCP Protest LIVE : गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी
एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर गोंधळ घातला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आज राज्यभर आंदोलन केलं जात आहे.
LIVE
Background
Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्या कोणत्याही वैद्यकीय चाचणीची गरज नाही : न्यायाधीश
अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्यामुळे आपल्याला जखम झाल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला होता. त्यावर न्यायाधीशांनी पाहणी केल्यानंतर सदावर्तेंच्या अंगावर कोणतीही जखम झाली नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर सदावर्तेंच्या कोणत्याही वैद्यकीय चाचणी करण्याची गरज नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं.
ST Strike : कायदेशीर कारवाई प्रत्येकावर होणार; कोणाचीही सुटका नाही: अनिल परब
कायदा हातात घेणाऱ्यांवर, प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे.
ST Strike : 109 जणांचा जामीन अर्ज नाकारला; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आता इतर 109 जणांचा जामीन अर्ज नाकारत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ST Protest : 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी
ST Protest : 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी 14 दिवसांची असणार आहे
Gunratna Sadawarte : गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी
Gunratna Sadawarte : गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
