'Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला-सुषमा अंधारे
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेपोटी महाराष्ट्र नासवलाय असा घणाघात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परभणीत केलाय.अंधारेंची मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रा आज परभणीत दाखल झाली यावेळी शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या महिला संवादात सुषमा अंधारे यांनी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय.महायुतीच्या नेत्यांची महिलांविषयी भूमिका अत्यंत खालच्या पातळीवर सुरू आहेत ते पाहता यांना रामच कळाला नाही जे नेते ७२ तास शब्द पाळू शकत नाहीत ते रामाचे काय होणार ? असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारलाय.एक वचनी एक पत्नी आणि एक विचार असलेला रामाचा खरा पाईक म्हणजे उद्धव ठाकरे असल्याचे हि सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य
सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना फोन करा आणि सगेसोयरे बाबत आवाज उठवायला सांगा.. 15 तारखेला अधिवेशनात जो आमदार बोलणार नाही त्या आमदाराला दारातही उभं करू नका- मनोज जरांगे पाटील यांचे नाशिकच्या दिंडोरी शहरातील जाहीर सभेत वक्तव्य
राज्यसभेच्या काँग्रेसला दहा जागा मिळणार
काँग्रेसला राज्यसभेच्या दहा जागा मिळण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी अथवा प्रियंका गांधी, पवन खेडा यांना राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.
Pune News : बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री आळंदीत; संत माऊली, तुकोबांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष
पुणे : बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री पुण्यातील देवाच्या आळंदीत आलेत. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माथा टेकवला. भाविकांची ही मोठी गर्दी होती, पोलिसांनी ही मोठा बंदोबस्त लावला होता. दर्शन घेऊन बाहेर पडताच धिरेंद्र शास्त्रींनी संत माऊली, तुकोबांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर धिरेंद्र शास्त्री अडचणीत आले होते. पण मी ही संत परंपरा जपणारा माणूस आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न ते अशा रीतीने करताना दिसतायेत.
राजन साळवी आणि कुुुटुंबियांना तूर्तास दिलासा नाही
राजन साळवी आणि कुुुटुंबियांना तूर्तास दिलासा नाही
एसीबीनं दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणी राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाची अटकपूर्व जामीनीसाठी हायकोर्टात याचिका
सरकाली वकील उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली