एक्स्प्लोर
काँग्रेस सोडलेल्या कोकणातील नेत्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग?
काँग्रेस सोडून गेलेल्या कोकणातील एका बड्या नेत्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा राष्ट्रवादीला हवी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : कोकणासह राज्यभरातील राजकारणातील खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आली आहे. काँग्रेस सोडून गेलेल्या कोकणातील एका बड्या नेत्याला आपल्या पक्षातर्फे उमेदवारी देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ताकद नसतानाही राष्ट्रवादी या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे. काँग्रेस सोडून गेलेल्या कोकणातील एका बड्या नेत्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला हवी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नेत्याच्या जोरावरच राष्ट्रवादी हे धाडस करण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात सुरु असलेल्या हालचालींमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जागा काँग्रेसकडे राहावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. काँग्रेस सोडून गेलेला संबंधित नेता मागच्या दरवाजाने महाघाडीत येण्याच्या शक्यतेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















