एक्स्प्लोर

Nawab Malik : समीर वानखेडेंची माफी मागितली नाही तर...; नवाब मलिकांना पुन्हा धमकीचं पत्र

समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही तर मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला गेला आहे.

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याच्या धमकीसह कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचं पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला नौदलात कर्नल असल्याचं सांगितलं आहे. मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने आपण पत्र लिहीत असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे. 

"समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही तर मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला गेला आहे. या संपूर्ण प्रकरणी आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून या पत्राची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. हे पत्र अभिजित बनसोडे नावाच्या व्यक्तीने कफ परेड मुंबई येथून लिहिलं असल्याचं म्हटलं आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, "आपण अशा धमक्यांना घाबरत नाही. मागे देखील अशाप्रकारच्या धमक्या मला फोनवरून आल्या होत्या. परंतु यातील एकाही धमकीला आपण घाबरलेलो नाही आणि घाबरणार नाही."

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात नवाब मलिक यांना एका निनावी फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजस्थानमधून हा फोन आल्याचे मलिक यांनी म्हटले होते. समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामात अडथळा आणू नका. अशी धमकी मलिक यांना देण्यात आली होती. या धमकीनंतर मलिक यांनी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होती. 

बॉलिवूडमधून समोर आलेलं ड्रग्ज कनेक्शन आणि मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक आरोप केला आहे. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून मलिक पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप करत आहेत. त्यावरूनच त्यांना अशा धमक्या मिळत आहेत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : 'परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती; एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर....' अंजली दमानियांचा गंभीर आरोप
'परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती; एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर....' अंजली दमानियांचा गंभीर आरोप
Pune Crime: बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली,  कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील VIDEO फुटेज समोर
बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली, कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज समोर
Laxman Hake : वाल्मिक कराडसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांना माझ्यासकट जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी; धस, दमानिया, जरांगेंवर हल्लाबोल
वाल्मिक कराडसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांना माझ्यासकट जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी; धस, दमानिया, जरांगेंवर हल्लाबोल
Torres Scam : शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्याने पैसे दिले, भाजीवाल्याने 4.5 कोटी गुंतवले, टोरेसने सगळ्यांनाच चुना लावला!
शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्याने पैसे दिले, भाजीवाल्याने 4.5 कोटी गुंतवले, टोरेसने सगळ्यांनाच चुना लावला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray On Fadanvis Meet :फडणवीसांसोबत बैठकीत काय चर्चा झाली?आदित्य ठाकरेंनी सगळं सांगितलंABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : 'परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती; एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर....' अंजली दमानियांचा गंभीर आरोप
'परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती; एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर....' अंजली दमानियांचा गंभीर आरोप
Pune Crime: बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली,  कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील VIDEO फुटेज समोर
बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली, कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज समोर
Laxman Hake : वाल्मिक कराडसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांना माझ्यासकट जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी; धस, दमानिया, जरांगेंवर हल्लाबोल
वाल्मिक कराडसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांना माझ्यासकट जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी; धस, दमानिया, जरांगेंवर हल्लाबोल
Torres Scam : शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्याने पैसे दिले, भाजीवाल्याने 4.5 कोटी गुंतवले, टोरेसने सगळ्यांनाच चुना लावला!
शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्याने पैसे दिले, भाजीवाल्याने 4.5 कोटी गुंतवले, टोरेसने सगळ्यांनाच चुना लावला!
Dilip Mandal: सावित्रीबाई फुलेंच्या चरित्र ग्रंथातील फातिमा शेख हे पात्र इतिहासात कधीच नव्हतं, दिलीप मंडल यांच्या सनसनाटी दाव्याने खळबळ
सावित्रीबाई फुलेंच्या चरित्र ग्रंथातील फातिमा शेख हे पात्र इतिहासात कधीच नव्हतं, दिलीप मंडल यांच्या सनसनाटी दाव्याने खळबळ
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंनी नोटीसच दाखवली; आता अर्थमंत्र्यांना भेटणार
वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंनी नोटीसच दाखवली; आता अर्थमंत्र्यांना भेटणार
Los Angeles Wildfires : कॅलिफोर्नियातील आगीत अनेक हॉलीवूड स्टार्सचा आलीशान बंगले आगीत बेचिराख; कमला हॅरिसांचं घर सुद्धा रिकामं केलं; 28 हजार घरांचे नुकसान, 3 लाख लोक बेघर
कॅलिफोर्नियातील आगीत अनेक हॉलीवूड स्टार्सचा आलीशान बंगले आगीत बेचिराख; कमला हॅरिसांचं घर सुद्धा रिकामं केलं; 28 हजार घरांचे नुकसान, 3 लाख लोक बेघर
Embed widget