एक्स्प्लोर

NCP : शरद पवारांनी पावसात सभा घेतली आणि निमोनिया भाजपला झाला ;  गोपीचंद पडळकरांना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर 

NCP : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी पावसात सभा घेतली आणि भाजपला निमोनिया झाला, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्त महेश तपासे यांनी केली आहे.  

NCP : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी 2019 मध्ये भर पावसात साताऱ्यात सभा घेतली. परंतु, या सभेमुळे भाजपला निमोनिया झाला आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईनचे स्वप्न भंगले, असा हल्लाबोल करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टिकेला प्रत्यूत्तर दिले आहे.  

2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पावसातील भाषणावरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. "साताऱ्यात पावसात भिजून तुम्हाला 54 च्यावर जाता आलं नाही. ती संख्या कायम ठेवण्यासाठी वारंवार घाबरू नका, काळजी करू नका, असं सांगावं लागत आहे, अशी टीका पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या टिकेला महेश तपासे यांनी उत्तर दिले आहे. 

महेश तपासे म्हणाले, "राज्यातील तरुणांनी शरद पवार यांना भरघोस पाठींबा दिला आहे. परंतु, भाजपच्या अनेक नेत्यांना याचं दुख: झालं आहे. याच दुख:तून भाजपचे नेते वारंवार शरद पवार यांच्यावर वेगवेगळे निमित्त शोधून टीका करत आहेत. मात्र, शरद पवार हे मजबूत राष्ट्रीय नेते असल्यामुळे त्यांच्यावर बोलून भाजपच्या नेत्यांना केवळ प्रसिद्धी मिळेल यापलीकडे काहीही होणार नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्र शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. "

भर पावसात शरद पवारांची सभा! 
2019 मध्ये उदनराजे भोसले यांनी राष्ट्रवाची साथ सोडून भाजमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली. 18 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर सभेचे आयोजन केले होते. सभेला सुरुवात होताच मोठा पाऊस सुरू झाला. परंतु, शरद पवार यांनी हातात माईक घेत डोक्यावर धरलेली छत्री बाजूला काढण्याची कार्यकर्त्याला सूचना केली आणि भर पावसात त्यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. सातारकरांची नाळ ओळखून भिजतच उपस्थितांना त्यांनी अनेक शाब्दिक सल्ले दिले. या सभेने उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता.  

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वासParali Beed Public Reaction on Polls : राज्यात मतदानाची वेळ संपली, परळीकरांचा कौल कुणाच्या बाजूने?Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरंCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Embed widget