एक्स्प्लोर

"तुम्ही अजूनही साडेतीन जिल्ह्यातच..."; भाजपकडून शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

BJP Maharashtra On Sharad Pawar Statement : शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असं म्हणत भाजपनं निशाणा साधला आहे.

BJP Maharashtra On Sharad Pawar Statement : राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांनी काल शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी आमदारांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरुन चर्चा केली. त्यावेळी घाबरण्याची गरज नाही. आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या याच वक्तव्याला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आदरणीय पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्यावर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!" तसेच, आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, "आदरणीय शरद पवार साहेब... कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला 105 जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल." 

एवढंच नाहीतर, भाजपनं काही प्रश्न मांडले आहेत. तसेच शरद पवारांना हे प्रश्न सोडवून दाखवा असं आवाहन केलं आहे. भाजपनं ट्वीट केलंय की, "आदरणीय पवारजी, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी हे प्रश्न सोडून दाखवा. राज्यात एसटी बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत. मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा." 

काय म्हणाले होते शरद पवार? 

देशात काही दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या निकालांमध्ये पाचपैकी चार राज्यांत एकहाती सत्ता मिळवली, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं बाजी मारली. याच निवडणुकांच्या निकालांबाबत युवा आमदारांनी शरद पवारांसमोर आपापले प्रश्न मांडले. त्यानंतर बैठक संपल्यानंतर ज्यावेळी सर्व आमदार जाण्यासाठी निघाले. त्यावेळी शरद पवार उभे राहिले, त्यांनी दोन्ही हात उंचावले आणि आपल्या हाताची मुठ बंद करुन म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही. 

भाजपच्या नेत्यांकडून शिकण्यासारखं बरच काही : शरद पवार 

भाजप जरी आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला, तरी भाजपमधील काही नेत्यांकडून शिकण्यासारखं बरच काही आहे, असं शरद पवार युवा आमदारांशी बोलताना म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे, दिवसाला 24 तास काम करण्याचीही तयारी, योजनांची आखणी आणि निवडणुकांसाठी आखण्यात आलेली रणनिती यांसारखे अनेक गुण आहेत. जे भाजप नेत्यांकडून शिकण्याची गरज आहे. त्यासोबतच शरद पवारांनी युवा आमदारांना को-ऑपरेटिव्ह सेक्टर आणि सामाजिक क्षेत्रांशी जोडण्याचाही मंत्र दिला आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  17 डिसेंबर 2024 : ABP MajhaJawaharlal Nehru Letters Special Report:पंडित नेहरुंची पत्रं,वादाचं नवं कोरं सत्र! प्रकरण नेमकं काय?Sangit Sawayamvar Special Report : संगीत स्वयंवर नाटकाचा डोळे दिपवणारा प्रयोगTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 17 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Embed widget