एक्स्प्लोर

काही काळापासून भाजपमधील काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करताहेत, एकनाथ खडसेंचा आरोप

गेल्या चारपाच वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करीत असल्याचं पाहायला मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

जळगाव : मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपा ने नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र गेल्या चारपाच वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करीत असल्याचं पाहायला मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

यावेळी बोलताना खडसे यांनी म्हटलं आहे की गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला, माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले, बदनाम करण्याचे काम केले, चंद्रकांत बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आले असेल, धनगर समाजाचे अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर असतील अशी कितीतरी नाव आहेत. यांचा काहींना काही कारणाने छळ करण्यात आला मात्र पार्टी म्हणून तो सहन करण्यात आला होता. 

खडसे म्हणाले की, अलीकडे चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना धमकी दिली की तुम्ही जामिनावर आहात, म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या विरोधात असो की छगन भुजबळ यांच्या बाबत असो ईडी लावण्याचा प्रकार म्हणजे सर्व षडयंत्र यांचेच आहे हे आता उघड व्हायला लागले आहे. म्हणजे यांच्या विरोधात बोललं, यांच्यासोबत गेले नाही, आमची साथ देणार नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात ईडी किंवा सीबीआय लावू असा त्याचा अर्थ आहे. मात्र छगन भुजबळ अशा गोष्टींना घाबरतील असे नाही अस खडसे यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले की, सरकार आले, सरकार गेले मात्र विरोधकांना कारण नसताना ईडी लावावी आणि त्याचा छळ करवा अस कधी घडत नव्हतं. मात्र अलीकडच्या काळात मात्र माझा कोणताही संबंध नसताना केवळ मी पक्ष बदलला म्हणून त्रास देण्यासाठी चौकशा लावण्याचा प्रयत्न केला जात आहेत.पूर्वी ईडी किंवा अन्य गोष्टी जनतेला माहीत नव्हत्या. त्या आता माहीत होऊ लागल्या आहेत. मात्र विरोधकांना दाबून ठेवण्यासाठी जर अशा यंत्रणांचा वापर केला जात असेल तर ते योग्य नसल्याचं ही खडसे यांनी म्हटलं.

खडसे म्हणाले की,  सध्याची परिस्थिती हालाखीची आहे या परिस्थिती मध्ये कोणीही राजकारण करू नये, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली आहे आणि अशाच प्रकारची भूमिका आपण मागच्या महिन्यात मांडली होती. त्यामुळे विरोधक असो वा सत्ताधारी यांनी मतभेद विसरून एकत्र येऊन कोरोनाची लढाई लढली पाहिजे. केवळ टीकाटिपण्णी करून यंत्रणा ही नाउमेद होत असते. त्यामुळे असं होता कामा नये, असं गडकरी यांनी म्हटलं आहे आणि आपण त्यांच्या मताशी सहमत असल्याची प्रतिक्रिया एकनाथरा खडसे यांनी जळगाव येथे दिली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
Actor Satish Shah Passed Away: बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
Shivsena : मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट
मोठी बातमी, महायुतीत समसमान जागा वाटप व्हावं, मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही
Phaltan Doctor Death: 80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 2 PM : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 OCT 2025 : ABP Majha
Banjara Protest :  बंजारा समाजाचं उपोषण अखेर मागे, मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटीला
BMC Polls: 'वन फिफ्टी प्लस'चं टार्गेट, मुंबई पालिकेसाठी भाजपचा नवा जागावाटप फॉर्म्युला
Doctors Protest: 'कारवाई न झाल्यास आंदोलन', Phaltan महिला डॉक्टर प्रकरणी निवासी डॉक्टरांचा इशारा
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा, दिवाळी सुट्टीचा शेवटचा वीकेंड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
Actor Satish Shah Passed Away: बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
Shivsena : मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट
मोठी बातमी, महायुतीत समसमान जागा वाटप व्हावं, मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही
Phaltan Doctor Death: 80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
Phaltan Doctor Death: डॉक्टर महिलेने खासदारांनी दम दिला, असं कुठेही म्हटलेलं नाही; फोन कॉलबाबतच्या थिअरीवर रणजीतसिंह निंबाळकरांचं स्पष्टीकरण
डॉक्टर महिलेने खासदारांनी दम दिला, असं कुठेही म्हटलेलं नाही; फोन कॉलबाबतच्या थिअरीवर रणजीतसिंह निंबाळकरांचं स्पष्टीकरण
Adam Gilchrist: कधीकाळी टीम इंडियाला धडकी भरवणारा अॅडम गिलख्रिस्ट म्हणतो, फक्त एक सेल्फी रोहितसोबत घेतला काय अन् अवघ्या 24 तासात...
कधीकाळी टीम इंडियाला धडकी भरवणारा अॅडम गिलख्रिस्ट म्हणतो, फक्त एक सेल्फी रोहितसोबत घेतला काय अन् अवघ्या 24 तासात...
Raj Thackeray MNS Meeting: न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मध्यरात्री बाईकला धडक देऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने काढला पळ,  हिट-अँड-रन प्रकार चर्चेत, नेमकं घडलं काय?
मध्यरात्री बाईकला धडक देऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने काढला पळ, हिट-अँड-रन प्रकार चर्चेत, नेमकं घडलं काय?
Embed widget