एक्स्प्लोर

Eknath Khadse : एकनाथ खडसेंचं कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्यात आंदोलन, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा

जळगाव जिल्हा दूध संघातील अपहारासंबंधी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रात्रभर आंदोलन सुरुच ठेवलं.

Eknath Khadse : जळगाव जिल्हा दूध संघातील अपहारासंबंधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. मेलो तरी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा इशारा खडसेंनी दिला होता. त्यानंतर तब्बल आठ तासांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करुन घेतला आहे. अर्ज दाखल करुन घेतला असला तरी गुन्ह्याची नोंद अद्यापही केली नाही. त्यामुळं गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी एकनाथ खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळं पोलिसांची चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.

जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार

दरम्यान, रात्री उशिरा एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना पोलिसांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. चोरीच्या गुन्हात पोलिसांनी गुन्हा नोंद करुन आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना फरार करण्यात मदत केल्याचा गंभीर आरोप खडसेंनी पोलिसांवर केला आहे. एखाद्या चोरीचा गुन्हा नोंदवण्यात येण्यासाठी आपल्यासारख्यांवर जर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दूध संघातील चोरीच्या गुन्हात जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत आपण आपले आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिला. 

तब्बल आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी घेतली तक्रार

एकनाथ खडसेंच्या तब्बल आठ तासांच्या आंदोलनानंतर अखेर पोलिसांनी तक्रार घेतली आहे. दूध संघात अपहार नव्हे तर दूध संघात चोरी झाल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे. केवळ फिर्याद घेतल्याची पोलिसांनी पोहोच दिली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळं आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी अपहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एकनाथ खडसे यांच शहर पेालीस ठाण्यात आंदोलन सुरु होते. मात्र, पोलिसांकडून कुठलीही तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. पोलीस याप्रकरणात कुठलीही नोंद घेत नसल्याने यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा चांगलाच संताप झाला. तब्बल आठ उलटल्यानंतर अखेर याप्रकरणात पोलिसांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद घेतली आहे. तर दुसरीकडे दूध संघात अपहार झाला आहे, असे आंदोलन सुरु झाल्यापासून सांगणाऱ्या एकनाथ खडसेंनी युटर्न घेत आता याप्रकरणात अपहार नव्हे तर चोरी झाल्याचे बोलतांना सांगितले आहे. दरम्यान खडसेंच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. 
 
जिल्हा दूध संघांत मालाच्या तपासणीत दूध संघातून 14 टन 80 लाखांचे पांढरे लोणी बाहेरच्या जिल्ह्यात पाठवण्याचे भासवण्यात आलं आहे. प्रत्यक्षात माल बाहेर गेल्याबद्दलच्या नोंदी आढळून आलेल्या नाही. तर दूधाच्या पावडरच्या साठ्यात 30 ते 35 लाख रुपये किंमतीच्या 360 बॅगची तफावत आढळून आली आहे. असे एकंदरीत 1 कोटी 15 लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे तपासणीतून समोर आले असून संबंधित माल हा दूध संघातील अधिकाऱ्यांच्या मदतीने इतरांनी चोरी केल्याचे दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. या तक्रारीनुसार संशयित आरोपी कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करावा असे लिमये यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

माझ्या बाबतीत अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार : खडसे

या फिर्यादीची पोलिसांकडून केवळ पोहोच देण्यात आली आहे. अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संशयित आरोपींना संरक्षण देण्याची पूर्ण भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे असून, पोलिसांच्या मदतीनेच गुन्हेगार फरार झाले आहेत. संशयित हे आता फरार झाल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. अद्यापही न्याय मिळालेला नाही, जर माझ्या बाबतीत अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार असा प्रश्नही एकनाथ खडसेंनी उपस्थित केला. तसेच पोलिसांचे व आरोपींचे साटेलोटे असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला असून आंदोलन अजून संपलेले नाही असेही खडसेंनी स्पष्ट केले आहे. तब्बल एक ते दीड कोटी रुपयांची चोरी होते, तरीही त्याचा गुन्हा दाखल होत नाही. आजच्या प्रकारावरुन राज्यात वाईट स्थिती असून कायदा व सुव्यवस्थेवरचा विश्वास उडाला असल्याची खंतही एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. 

महत्त्वाच्या बातम्या:

Eknath Khadse : पाया पडतो... गुन्हा दाखल करा; जिल्हा दूध संघातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकनाथ खडसेंचा पोलिस ठाण्यात ठिय्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Embed widget