एक्स्प्लोर

'राष्ट्रवादीत आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते हे कळलं', एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य

राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते याची आपल्याला माहिती मिळाली असल्याचं खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केल्याने पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जळगाव : राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते याची आपल्याला माहिती मिळाली असल्याचं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्याने पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  खडसे म्हणाले की, भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर कळलं.  खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका करताना आपण कुणाच्या कृपेने आमदार झाले याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागे ईडी लावली, वेगवेगळ्या चौकशा लावल्या,इन्कम टॅक्स लावल्या, रेड झाल्या, मात्र त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं. मात्र तरीही आता ईडी लावण्यात आली आहे, असं खडसे म्हणाले.

खडसे म्हणाले की, या ईडीने लावलेल्या चार्जशिटचा विचार केला तर आपल्यावर कलियुगात कुणी कुणावर लावले नसतील, इतके नको नको ते आरोप लाऊन, कुणाकुणाशी संबंध जुळवून आपल्याला मास्टर माईंड ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ दोन कोटी रुपयांच्या कर्जांसाठी ईडी लावण्यात आली. जे कर्ज आपण नियमानुसार व्याजासह फेडले आहे. सर्व सामान्य पणे ईडी कोणाला लावली जाते. ज्या ठिकाणी हजार बाराशे कोटी वर मनी लॉन्ड्रिंग झालं असेल. मात्र आपल्याला केवळ दोन कोटी रुपयांसाठी ईडी चौकशी लावण्यात आली आहे. केवळ छळण्यासाठी हे केले जात आहे, असं ते म्हणाले.

त्यांनी म्हटलं की,  जावयाला कोणताही संबंध नसताना अटक केली आहे. कोणत्याही परिस्थितीत नाथाभाऊला अटक  करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केले जात आहेत.  एक टक्का जरी खरं असेल तर आपण फाशी घ्यायला तयार आहोत. गेल्या चाळीस वर्षात कोणतीही तक्रार नव्हती. अचानक आपण बिघडायला का मी विश्वामित्र आहे. मी साधा माणूस आहे. मात्र मला बदनाम करण्याचे, चोर ठरविण्याचे हे जे काही षडयंत्र सुरू आहे हे मी भारी आहे म्हणून हे केले जात आहे, असंही खडसे म्हणाले.  

गिरीश महाजन यांनी आपल्याकडे खडसे यांचे शंभर उतारे असल्याचं माध्यमांच्या पुढे म्हटलं होतं. यावर उत्तर देताना खडसे यांनी म्हटलं आहे की,  आपल्याकडे जे आहे ते सर्व आपण इन्कम टॅक्सला दाखवलं आहे या मालमत्तेपेक्षा एक रुपया जरी जास्त माझ्याकडं निघाला तर माझी ती प्रॉपर्टी मी तुम्हाला दान द्यायला तयार आहे. आपण चाळीस वर्षात अनेक विकास काम केली.  जिल्हापरिषद ताब्यात आली, ग्रामपंचायत समित्या आल्या, दूध संघ आला, जिल्हा बँक आली. त्या बदल्यात आपल्याला निवडणुकीत कधी तिकीट दिले जाणार नाही असं कधी वाटलं नव्हते. मात्र इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी हा कृतघ्नपणा आपल्यासोबत केला आहे, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, माझ्यावर खोटे आरोप लावून माझं मंत्री पद काढून घेण्यात आले. थेट दाऊदच्या बायकोशी माझा संबंध जोडण्यात आला. त्या पक्षात मला वारंवार छळण्याचा आणि बदनाम करण्याचा,  अपमान करण्याचा प्रयत्न केला गेला. मला छळणारा तो व्यक्ती कोण तुम्हाला माहीत आहे तो व्यक्ती जर तुम्हाला शोधायचा असेल तर गुगलवर जा आणि टरबुजा महाराष्ट्र एवढं टाका म्हणजे तुम्हाला कळेल कोण आहे, असं देखील खडसे म्हणाले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Embed widget