एक्स्प्लोर

इस्लामपूरच्या महिला मुख्याधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक

इस्लामपूर शहरातील नगरपालिकेच्याच घंटा गाडीतून दारूच्या बाटल्याची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही गाडी का ताब्यात घेतली असं म्हणत राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधवने थेट मुख्याधिकारी केबिनमध्ये घुसून मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या अंगावर खुर्ची घेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता.

सांगली : इस्लामपुरातील महिला मुख्याधिकाऱ्यांला जीवे मारण्याची धमकी देणारा राष्ट्रवादीचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधवला अखेर अटक करण्यात आली आहे. आज इस्लामपूर पोलिसांनी भल्या पहाटे कारवाई करत खंडेराव जाधवला अटक केली. काही दिवसांपूर्वी इस्लामपूर शहरातील कोरोनाबाधीत कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्याच घंटा गाडीतून दारूच्या बाटल्याची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही गाडी का ताब्यात घेतली असं म्हणत राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधवने थेट मुख्याधिकारी केबिनमध्ये घुसून मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या अंगावर खुर्ची घेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर खंडेराव जाधव फरार झाला होता. इस्लामपूर पोलीस ठाण्यात खंडेराव जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

इस्लामपूर शहरातील कोरोनाबाधित कंटेनमेंट झोनमध्ये नगरपालिकेच्याच घंटा गाडीतून दारूच्या बाटल्याची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारावरून राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांनी थेट मुख्याधिकारी केबिनमध्ये घुसून मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या अंगावर खुर्ची घेऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. 'तुझे घराबाहेर निघणे मुश्किल करतो, तुला व तुझ्या कुटुंबाला बघून घेतो' अशी धमकी जाधवने दिली होती. मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये पाच ते सात मिनिटे हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी मुख्याधिकारी पवार यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, महिला आयोगाला त्यांनी घटनेबाबतचे पत्रही दिलं होतं.

कंटेनमेंट झोनमध्ये नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीमधून दारू वाहतूक होत असल्याबाबत त्या प्रभागाचे नगरसेवक अमित ओसवाल यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. ही बाब गंभीर असल्याने आणि पालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारी असल्याने संबंधित वाहनावरील ठेकेदारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी करण्याचे आदेश त्या मुकादमाला दिले होते. या प्रकारानंतर प्रभारी आरोग्य अधिकारी साहेबराव जाधव यांच्या मोबाईलवर नगरसेवक खंडेराव जाधव यांनी फोन केला. ते वाहन का धरून ठेवले आहे अशी विचारणा केली. त्यावेळी साहेबराव जाधव यांनी त्या वाहनाबाबत नक्की काय प्रकार घडलाय ते माहित नसल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर खंडेराव जाधवने मुख्याधिकाऱ्यांना फोन करून आपण नक्की कशासाठी कार्यवाही करत आहात, अशी विचारणा केली. यावेळी पालिकेची प्रतिमा मलीन होत आहे, या प्रकरणात मी कोणत्याही नगरसेवकांचे नाव किंवा चोरटी दारू वाहतूक होत आहे याचा उल्लेख केलेला नाही. या फोननंतर थोड्याच वेळात नगरसेवक खंडेराव जाधव मुख्याधिकारी यांच्या दालनात आला. 'तुम्हा सर्वांना दाखवतोच, उगाच माझे तोंड खवळू नका' असे बोलल्यावर मुख्याधिकारी 'तुम्ही नक्की कोणाला काय दाखवणार आहात?' असे विचारल्यावर चिडून त्यांनी 'ये बाई तुला मस्ती आली आहे' असे म्हणून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

केबिनमधील खुर्ची उचलून खंडेराव जाधव मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अभियंता जमिर मुश्रीफ व साहेबराव जाधव यांनी त्यांना धरून ठेवले. तरीही शिवीगाळ करत जाधव अंगावर धावून जात होता. त्यानंतर 'तुझे घराबाहेर निघणे मुश्किल करतो, तुला बघून घेतो, तुझ्या कुटुंबाला बघून घेतो' अशी धमकी दिली. मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये पाच ते सात मिनिटे हा प्रकार सुरू होता.

मुख्याधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांना पत्र

मुख्याधिकारी यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून एकही दिवस सुट्टी न घेता 24 तास काम करत आहेत. दिवसभर कोरोनाबाधित परिसरात फिरत असल्याने आम्ही घरातही कुटुंबापासून लांब राहून शहराच्या हितासाठी काम करत आहोत. आम्ही सर्वजण नोकरीपेक्षा सामाजिक उत्तरदायित्वच्या भावनेतून राबत असताना खंडेराव जाधव यांच्या कृत्याने माझ्यासह सर्व कर्मचारी भयभीत झाले आहेत. या नगरसेवकाने सर्वांच्या समक्ष मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मला व माझ्या कुटुंबाला बघून घेतो अशी धमकी दिलेली आहे. या सर्व प्रकारामुळे मी भयभीत झालेली असून नगरसेवक जाधव यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे.' सदरच्या घंटागाडीतून दारू वाहतूक होत असलेल्या तक्रारीमुळे जाधव एवढे का चिडले आणि त्यातून घडलेला हा सर्व प्रकार अनाकलनीय आहे. या प्रकरणाशी संबंधित नगरसेवक यांचा संबंध असल्याचा मला संशय आहे. या प्रकाराबाबत जाधव यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य ढासळणार नाही, या आशयाचे पत्र त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख, महिला आयोगाच्या अध्यक्ष, मानवी हक्क आयोग, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP MajhaAjit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Embed widget