(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : शरद पवारांनी डॉ. अमोल कोल्हेंना शेजारी बसण्यास सांगितलं, येवल्यातील सभेत पवारांची कृती चर्चेत
Sharad Pawar : येवल्यातील सभेला सुरुवात झाल्यानंतर शरद पवार यांनी इशाऱ्याने खुणवत अमोल कोल्हे यांना शेजारी बसण्यास सांगितले.
Sharad Pawar : आज शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत येवल्यात सभेला सुरुवात झाली असून या सभेच्या सुरवातीलाच शरद पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना बोलवून घेत आपल्या शेजारी बसण्यास सांगितले. आजूबाजूच्या आयोजकांना इशारा करत कोल्हे यांना आवाज देऊन शरद पवार आपल्या शेजारी कोल्हे यांना बसविल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधील घडामोडीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आपला संयम ढळू दिलेला नाही. गेल्या दोन-तीन दिवसात पक्ष सोडून गेलेल्या पेक्षा आगामी काळात ते काय भूमिका घेणार याविषयी ते सातत्याने बोलत आहेत. याच पार्श्वभूमी येवला येथील सभेत लोकांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबरोबरच रोहित पवार हे देखील सातत्याने शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. आजही ते येवल्याच्या सोबत उपस्थित आहेत, मात्र यात विशेष बाब म्हणजे आज अमोल कोल्हे देखील शरद पवार यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळत असून सभेला सुरुवात झाल्यानंतर शरद पवार यांनी इशाऱ्याने खुणवत अमोल कोल्हे यांना शेजारी बसण्यास सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (Maharashtra NCP) पक्षाचे काही आमदार बरोबर घेत अजित पवार शिंदे भाजप यांचा सत्तेत थांबेल झाल्यानंतर शरद पवार यांच्या पाय खालची जमीनच सरकली. राष्ट्रवादी पक्षातील महत्त्वपूर्ण नेते असलेले डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सुद्धा शपथविधीला उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र दुसऱ्या क्षणी अमोल कोल्हे यांनी करत आपण साहेबांसोबत असल्याचं जाहीर केलं आणि त्यांनी सरकारमध्ये सामील होण्यास नकार दिला. त्यानंतर आज ते सकाळपासूनच शरद पवार यांच्या सोबत असून मुंबई ते येवला असा प्रवास त्यांनी एका गाडीत केल्याचंही पाहायला मिळालं.
रोहित पवारांचा संवाद वाढला
गेल्या दोन-तीन दिवसात शरद पवार यांच्याबरोबर सुप्रिया सुळे याही अधिक वेळ दिसेल नाहीत. परंतु रोहित पवार हे त्यांचे सातत्याने काळजी घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदा असो किंवा कोणता निर्णय जाहीर करण्यास या प्रकरणात संबंधितांना सूचना द्यायच्या असो अशावेळी शरद पवार हे रोहित पवार यांच्याशी संवाद साधत असल्याचे सातत्याने दिसत आहे. येवला सभेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे आदल्या दिवशीच नाशिकला दाखल झाले होते. त्यांनी स्थळाची पाहणी करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यामुळे रोहित पवार हे देखील आगामी काळात नवे नेतृत्व म्हणून उदयाला येऊ शकत, अशी शक्यता आहे. मात्र आजच्या सभेत रोहित पवार हे स्टेजच्या जवळच पण कार्यकर्त्यांसोबत बसल्याचे पाहायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या :