Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून NCPने 'मुख्यमंत्री' शब्द वगळल्यावर शिंदे गटाचा आक्षेप; राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय, 'आता योजनेचे नाव...'
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ‘ मुख्यमंत्री ’ शब्द वगळल्याने मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे गटातील मंत्र्यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर आता राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे: राज्याच्या कानाकोपऱ्यात सध्या चर्चेत असलेली राज्य सरकारची 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)चांगलीच चर्चेत आहे, या योजनेच्या श्रेयवादावरून देखील मोठ्या चर्चा आणि वाद होतानाचं चित्र आहे, अशातच काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री’ शब्द वगळल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांनी आक्षेप घेत मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ते लाडकी बहीण योजनेचं पुर्ण नाव वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्यां पक्षाकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (Ladki Bahin Yojana) योजनेच्या नावातून 'मुख्यमंत्री' हा शब्द वगळला जात असल्यामुळे शिवसेना (शिंदे गटाच्या) मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीमध्येच नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महायुतीतील धुसफूस समोर आली होती. राज्यभरात अजित पवार आणि नेते या योजनेचा प्रचार आणि प्रसार करत आहेत, मात्र त्यांनी या योजनेतील मुख्यमंत्री शब्द वगळ्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांच्या नाराजीनंतर आता या योजनेचे पूर्ण नाव वापरण्याची हमी अजित पवार गटाने दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघात आणि राज्याच्या काही भागात काढलेल्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये पक्षाने लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर भर दिला आहे. मात्र, त्यांच्या सर्व बॅनरवर आणि त्यांच्या सोशल मीडियावर या योजनेचा उल्लेख केवळ 'माझी लाडकी बहीण' असा केला आहे, मुख्यमंत्री हा शब्द वगळून या योजनेचे सर्व श्रेय अर्थमंत्री म्हणून अजित पवार घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आक्षेप घेतला होता. आता त्यामुळे आता या योजनेच्या अजित पवार गटाने यात दुरुस्ती करण्याचे ठरवले आहे. याबाबतचे वृत्त 'लोकमत' या वृत्तसंस्थेने दिले आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रम आणि जनसन्मान यात्रेत लाडकी बहीण योजनेची प्रसार करून अर्थमंत्री म्हणून अजित पवार या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र योजनेचे नाव ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण ’ (Ladki Bahin Yojana)असे आहे. मात्र त्यांच्या जाहिराती फ्लेक्स व बॅनर यावरून मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटल्याचं दिसून आलं.
शिवसेना (शिंगे गटाचे) मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला, त्यानंतर दादा भुसे, गुलाबराव पाटील शिंदे गटातील आणखी काही मंत्र्यांनीही लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री शब्द वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या बैठकीसाठी अजित पवार उपस्थित नव्हते. ही योजना महायुती सरकारची असून राज्यात त्यावरुन चुकीचा संदेश जाणे योग्य नाही, असे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. शिंदे गटातील मंत्र्यांनी जे मुद्दे मांडले ते अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवले जातील त्याचबरोबर त्याची योग्य नोंद घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीवेळी स्पष्ट केले होते. त्यावर आता अजित पवाराच्या राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला आहे.