एक्स्प्लोर

नक्षली नेता नर्मदाक्का पतीसह अटकेत, दोघांवर जवळपास 50 लाखांच बक्षीस

याआधी किमान दोनदा तिचा चकमकीत मृत्यू झाल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. महाराष्ट्र पोलिसांनी तिच्यावर 25 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मूळ निवासी असलेली नर्मदाक्का गेली 22 वर्ष भूमिगत राहून हिंसक नक्षली कारवाया करत होती.

गडचिरोली : नक्षल चळवळीतील सर्वोच्च संघटना असलेल्या CPI (Maoist) संघटनेची एकमेव महिला सदस्य असलेल्या नर्मदाक्का हिला पतीसह गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोली पोलीस अथवा राज्याच्या नक्षलविरोधी अभियान कार्यालयाने याला दुजोरा दिलेला नाही. मात्र या दोघांना आठवडाभरापूर्वीच गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केले गेले असून सध्या त्यांची सविस्तर चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

नर्मदाक्का आपल्या आजारी पतीसह हैदराबाद येथील रुग्णालयात असताना तेलंगणा पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी तिला अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 2012 रोजी तिला दक्षिण गडचिरोलीच्या नक्षल कारवायांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर तिच्या कार्यक्षेत्रात वाढ केली गेली. आदिवासी आणि जनजातीय क्षेत्र-दंडकारण्यातील महिलांना नक्षल चळवळीत दाखल करुन घेण्यात तिचा मोठा हातभार आहे.

पोलिसांविरोधात संघर्ष करण्यासाठी तिने अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज संघटनांतर्गत एका वेगळ्या पथकाची स्थापना देखील केली होती. तिच्यावर जाळपोळ, हत्या, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान अशा हिंसक प्रकरणात एकूण 53 गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा याला नर्मदाक्का व अन्य काही जहाल नेत्यांना रसद पुरविण्याप्रकरणी अटक करण्यात आल्यामुळे ती पुन्हा प्रकाशझोतात आली होती.

याआधी किमान दोनदा तिचा चकमकीत मृत्यू झाल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. महाराष्ट्र पोलिसांनी तिच्यावर 25 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मूळ निवासी असलेली नर्मदाक्का गेली 22 वर्ष भूमिगत राहून हिंसक नक्षली कारवाया करत होती. दरम्यान तिचा पती किरणकुमार चळवळीतील मोठे नाव असून तो दंडकारण्य स्पेशन झोन कमिटीचा सदस्य आहे. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांची थेट जबाबदारी असल्याची माहिती पुढे आली आहे.

किरणकुमारवर महाराष्ट्र सरकारचे 20 लाखाचे बक्षीस ठेवलं आहे. तंत्रज्ञानविषयक अनुभव असलेल्या किरणकुमारवर नक्षल्यांचे मुखपत्र असलेल्या 'प्रभात' मासिकाच्या संपादनाची जबाबदारी होती. तेलंगणा राज्यातील विजयवाडा येथील मूळ रहिवासी असलेल्या किरणकुमारवर नक्षली विचारधारेचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी देखील होती. विशेष म्हणजे 1 मे 2019 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे पोलीस वाहनाला लक्ष्य करत स्फोटाने उडविल्याप्रकरणी कटाचा किरणकुमार मुख्य सूत्रधार असल्याचे समजते.

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget