Nawab Malik ED Arrested Live : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी
Nawab Malik ED Enquiry Live : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.
LIVE
Background
Nawab Malik ED Enquiry Live : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.
ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी पाच वाजताच नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाले अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रकरण काय?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
(Nawab Malik ED Enquiry Live Updates allegations against Maharashtra Minister connection with Dawood Ibrahim money Laundering NCPs Sharad Pawar Sanjay Raut attacks on BJP)
Nawab Malik : नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी
अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर मलिकांची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून न्यायालयात करण्यात आली. नुकतीच नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे.
Nawab Malik: उद्या सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे आंदोलन
नवाब मलिकांना अटक केल्याच्या निषेधार्थ उद्या सकाळी दहा वाजता मंत्रालयाच्या परिसरात महाविकास आघाडीचे मंत्री आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आम्ही धरणं आंदोलन करणार : छगन भुजबळ
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास मुंबईतील मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडी पक्षाचे मंत्री, आमदार धरणे आंदोलनाला बसणार आहेत. तसंच शुक्रवारपासून राज्यभरात शांततेत आंदोलन केलं जाणार आहे.
Nawab Malik: मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्राची ईडीकडून कारवाई; छगन भुजबळ
मलिक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असल्याने त्यांच्यावर ईडीने कारवाई केली असल्याचं राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. पीएमएलए कायदा अस्तित्वात नव्हता त्यावेळचे हे प्रकरण असून फक्त मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं ते म्हणाले.
नवाब मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्र सरकार हे करत आहे : छगन भुजबळ
1992 च्या एफआयआरबाबत 30 वर्षानंतर नवाब मलिकांचं नाव घेत त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. मलिक केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांविरोधात बोलतात म्हणून नवाब मलिकांचं तोंड बंद करण्यासाठी हे केलं जात आहे.