एक्स्प्लोर

43 तास, 250 किमी, नौदल अधिकाऱ्याची ‘रन फॉर साई’च्या प्रचारासाठी धाव

ब्रिज शर्मा हे अॅथलिट आहेत. 2016 साली कॅलिफोर्निया येथे झालेल्या बॅडवॉटर अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सर्वात वेगवान खेळाडू ठरले होते.

शिर्डी : भारतीय नौदलातील अधिकारी ब्रिज मोहन शर्मा यांनी सिद्धिविनायक ते शिर्डी असा नॉनस्टॉप धाव घेतली. 43 तासात ब्रिज मोहन शर्मांनी सिद्धिविनायक ते शिर्डी हा 250 किलोमीटरचं अतंर पार केलं. साई समाधी शताब्दी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थानने वर्षभर विविध कार्यक्रमांच आयोजन केलं आहे. 11 फेब्रुवारी रोजी साईबाबा संस्थानच्या वतीने ‘रन फॉर साई’ या आंतर्राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत देश विदेशातील खेळाडू तसेच भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा या करिता मुंबई येथील अॅथलिट आणि भारतीय नौदलातील अधिकारी ब्रिज मोहन शर्मा यांनी सिद्धीविनायक ते शिर्डी अशी नॉनस्टॉप धाव घेतली आणि मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ब्रिज शर्मा हे अॅथलिट आहेत. 2016 साली कॅलिफोर्निया येथे झालेल्या बॅडवॉटर अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सर्वात वेगवान खेळाडू ठरले होते. त्यानंतर ते प्रकाशझोतात आले. शिर्डीमध्ये ‘रन फॉर साई’ या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनात साईबाबा संस्थानसह ब्रिज शर्मा आणि त्यांचे सहकारी सामिल आहेत. आज सकाळी ब्रिज शर्मा शिर्डीला पोहोचले. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सर्व मॅरेथोर्नर्सच स्वागत केलं. या सर्वांनी साईंच्या नावाचा जयघोष करत साई समाधीच दर्शन घेतलं. सचिन तेंडुलकरच्या भाषणाने आपण  प्रेरित झाल्याचं सांगताना ब्रिज शर्मा यांनी हा देश खेळप्रेमी देश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मॅरेथॉन स्पर्धेबरोबरच 3 किमीच्या साई दिंडीचं आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले असून या दिंडीत संदेश देणारे देखावे सादर केले जाणार आहेत. साईभक्तांनी यात सहभाग घेण्याचं आवाहन संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Sushma Andhare On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
Nitin Gadkari ethanol: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
Embed widget