एक्स्प्लोर

Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...

Nag Panchami 2026: कालसर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा, भगवान शिवांची उपासना आणि काही विशेष धार्मिक विधी केल्याने खरंच दूर होतो का?

Nag Panchami 2026: यंदा म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी आहे आणि हा दिवस श्रावणातील सोमवारचा आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्याची हिंदू धर्मात प्राचीन परंपरा आहे. भगवान शिवांच्या गळ्यात नाग विराजमान असल्याने नागपूजेचा संबंध शिवभक्तीशीही जोडला जातो. या निमित्त अनेकांना प्रश्न पडतो की, माणसाच्या जीवनात जो अडचणी निर्माण करतो, असा कालसर्प योग या नागपंचमीला पूजा केल्याने दूर होतो का? ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय? धार्मिक महत्त्व काय? जाणून घ्या...

नागपंचमीच्या पूजेने कालसर्प दोष दूर होतो का? (Nag Panchami 2026)

ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जन्मकुंडलीतील राहू आणि केतूच्या स्थितीशी संबंधित ‘कालसर्प दोष’ असल्यास नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा, भगवान शिवांची उपासना आणि काही विशेष धार्मिक विधी केल्याने त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. काही धार्मिक परंपरांमध्ये नागपंचमीला कालसर्प दोषाच्या शांतीसाठी विशेष दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्प दोष, सर्प शाप, वंध्यत्व, राहू-केतूचे अडथळे आणि इतर नकारात्मक प्रभावांचे दुष्परिणाम शांत करण्यासाठी नागपंचमी हा एक शुभ काळ आहे. कालसर्प दोष ही ज्योतिषशास्त्रातील संकल्पना आहे. त्यामुळे हा उपाय धार्मिक श्रद्धा आणि परंपरेच्या चौकटीतच पाहणे योग्य ठरेल.

नागपंचमीला नागांची पूजा का केली जाते?

धार्मिक मान्यतेनुसार नागदेवता ही पूजनीय मानली जाते. अनंत, वासुकी, शेष, पद्म, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिय अशा नागांचा उल्लेख विविध धार्मिक परंपरांमध्ये आढळतो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे प्रतीकात्मक पूजन करून सर्पभयापासून संरक्षण आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. पावसाळ्यात साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे प्राचीन काळापासून सर्पांबद्दल आदर आणि त्यांना इजा न करण्याचा संदेशही या सणातून दिला जात असल्याचे मानले जाते.

नागपंचमीची कथा काय सांगते?

एका गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणी करू नये, अशी त्या गावात प्रथा होती. मात्र ब्राह्मणाने या प्रथेकडे दुर्लक्ष केले. तो बैल आणि नांगर घेऊन शेतात गेला आणि नांगरणी करू लागला. त्याच शेतात एका नागिणीने आपली पिल्ले ठेवली होती. नांगरणी करताना नांगराच्या फाळाखाली नागिणीची पिल्ले आली आणि त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने नागीण तेथे आली. आपल्या पिल्लांचा मृत्यू झाल्याचे पाहून ती संतापली. तिने ब्राह्मणाला दंश केला आणि त्याचा मृत्यू झाला. रागाच्या भरात नागीण ब्राह्मणाच्या घरी पोहोचली आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही दंश केला. त्यानंतर ब्राह्मणाची एक मुलगी लग्न होऊन दुसऱ्या गावात राहत असल्याचे तिला समजले. तिलाही दंश करण्यासाठी नागीण तिच्या घरी पोहोचली. मात्र तेथे पोहोचल्यावर तिने एक वेगळेच दृश्य पाहिले. ब्राह्मणाची मुलगी नागपंचमीची पूजा मनोभावे करत होती. तिने नागदेवतेची प्रतिमा ठेवली होती आणि धूप, दीप, फुले, नैवेद्य व दूध अर्पण करून श्रद्धेने नागदेवतेची पूजा केली होती. हे पाहून नागिणीच्या मनातील राग शांत झाला. तिला ब्राह्मणाच्या मुलीची श्रद्धा पाहून तिच्यावर दया आली. तिने तिला संपूर्ण घटना सांगितली. आपल्या आई-वडिलांसह भावंडांचा मृत्यू झाल्याचे ऐकून ब्राह्मणाची मुलगी दुःखी झाली आणि तिने नागिणीला आपल्या कुटुंबाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. ब्राह्मणाच्या मुलीची भक्ती आणि प्रार्थना पाहून नागिणी प्रसन्न झाली. तिने तिला अमृताचा कलश दिला आणि मृत कुटुंबीयांवर त्याचा शिडकावा करण्यास सांगितले. ब्राह्मणाच्या मुलीने नागिणीने सांगितल्याप्रमाणे अमृताचा शिडकावा केला. कथेनुसार, अमृताचा स्पर्श होताच तिचे आई-वडील, भाऊ आणि बहिणी पुन्हा जिवंत झाले. तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची श्रद्धेने पूजा करण्याची परंपरा अधिक दृढ झाली, अशी ही लोककथा सांगितली जाते.

नागपंचमीला काय करावे?

नागपंचमीला नागदेवतेच्या प्रतिमेचे किंवा मातीच्या नागमूर्तीचे पूजन, फुले, हळद-कुंकू, नैवेद्य अर्पण आणि प्रार्थना करण्याची परंपरा आहे. भगवान शिवांची पूजा करून ‘ॐ नमः शिवाय’ जप करण्याचीही प्रथा आहे. महत्त्वाचे म्हणजे, जिवंत सापांना दूध पाजणे टाळावे. प्रतीकात्मक नागमूर्ती किंवा प्रतिमेवरच पूजा-अर्चना करणे अधिक सुरक्षित आहे. सापांना पकडणे, हाताळणे किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप करणे टाळावे.

कालसर्प दोष शांत करण्यासाठी...

  • ज्योतिषशास्त्रानुसार, कालसर्प दोष शांत करण्यासाठी काही उपाय सुचविण्यात आले आहेत, 
  • नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नागांच्या जोड्या अभिषेक करून पाण्यात विसर्जित केल्या जातात. 
  • शिवमंदिरात तांब्याचा नाग अर्पण करण्याची आणि नियमित पूजा करण्याची परंपरा आहे. 
  • नागपंचमीच्या दिवशी घरातील वडीलधाऱ्यांचा नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आजही प्रचलित आहे. 
  • नागपंचमीच्या दिवशी किंवा श्रावण महिन्यात जमीन खोदली जात नाही, 
  • कारण श्रावण महिन्यात साप पिलांना जन्म देतात आणि जमीन खोदल्याने सापांना इजा होण्याची शक्यता जास्त असते.

हेही वाचा :

Nag Panchami 2026: नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 September 2026 : आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget