एक्स्प्लोर
मैत्रिणीशी वादानंतर नवी मुंबईत तरुणाचा लॉजमध्येच गळफास
नवी मुंबई : नवी मुंबईतल्या लॉजमध्ये 22 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतल्या कॉटन ग्रीन भागात राहणाऱ्या अक्षय कारखेलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
अक्षय कारखेले आपल्या मैत्रिणीसह साईछत्र लॉजमध्ये गेला होता. त्यावेळी त्याचा मैत्रिणीसह काही कारणावरुन वाद झाला. युवती जेव्हा फ्रेश होण्यासाठी बाथरुममध्ये गेली, त्यावेळी अक्षयने तिच्याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
युवती जेव्हा बाथरुममधून बाहेर आली तेव्हा तिला हा प्रकार कळला. लॉज व्यवस्थापनाला समजल्यावर त्यांनी याबाबत एपीएमसी पोलिसांना माहिती दिली. दोघांमध्ये काय वाद झाला, कशामुळे अक्षयने हे टोकाचं पाऊल उचललं, याबाबत अधिक तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement