एक्स्प्लोर

CIDCO : साडेबारा टक्केचा भूखंड मिळविण्यासाठी शेतकऱ्याचा सिडको कार्यालयात किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न 

दत्तू भिवा ठाकुर (78) हे शेतकरी उरणच्या धुतूम गावातील रहिवासी असून सिडकोने त्यांची जमीन 1984 मध्ये संपादित केली आहे.

नवी मुंबई : संपादित जमिनीच्या मोबदल्यात साडेबारा टक्के योजनेतील भूखंड देण्यास सिडकोकडून चाल ढकल करण्यात येत असल्याने उरणच्या धुतूम गावातील एका शेतकयाने सिडको कार्यालयात जाऊन किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. दत्तूम भिवा ठाकुर (78) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेतील शेतकरी दत्तू भिवा ठाकुर हे उरणच्या धुतूम गावातील रहिवासी असून सिडकोने त्यांची जमीन 1984 मध्ये संपादित केली आहे. त्यामुळे सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेअंर्गत भूखंड मिळविण्यासाठी दत्तू ठाकुर हे गेल्या अनेक वर्षापासून सिडकोमध्ये हेलपाटे घालत आहे. सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेतील भीखंड मिळत नसल्याने गत 18 ऑक्टोबर रोजी दत्तू ठाकुर हे सिडकोच्या कार्यालयात गेले होते, त्यावेळी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांची जमीन नियाज खात्यात येत असल्याने आणि नियाज खात्यातील जमिनींना साडेबारा टक्के योजनेचा लाभ देण्यासंदर्भातील विषय शासनाकडे प्रलंबित असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी दत्तू ठाकुर आपल्या घरी निघून गेले होते.   

सोमवारी दत्तू ठाकुर हे पुन्हा सिडकोच्या कार्यालयात पहिल्या मजल्यावर गेले होते. यावेळी ते सिडकोतील पहिल्या मजल्यावरील अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भूसंपादन ) सतीश खडके यांच्या दालनात गेल्यानंतर त्यांनी सोबत आणलेले किटकनाशक सदृश्य द्रव्य प्राशन केले. हा प्रकार तेथील अधिकाऱ्यांच्या  लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ दत्तू ठाकुर यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. 

सध्या ठाकुर यांच्यावर एमजीएम हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती सीबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. तर या घटनेची दखल घेतली असून त्याच्या निवेदनावर कारवाई करणार आहोत असं सिडकोकडून सांगण्यात आलं आहे. दत्तू भिवा ठाकूर यांच्याशी संबंधित विषय हा शासन दरबारी विचाराधीन असून त्याबाबतचा पाठपुरावा सिडकोतर्फे वेळोवेळी करण्यात येत असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, रूग्णालयातील उपचाराचा खर्च सिडको उचलणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget