एक्स्प्लोर

राज्यात पुन्हा गँगचा धुमाकूळ! नवी मुंबईत चड्डी बनियान, डोंबिवलीमध्ये तलवार तर पुण्यात कोयता गँगचा उच्छाद

नवी मुंबईत चड्डी बनियन गँगची दहशत पहायला मिळतेय. तर तिकडे डोंबिवलीमध्ये हातात तलवार घेऊन काहींनी दहशत परवलीये. त्यामुळे या टवाळखोरांना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येतेय.

मुंबई :  सध्या राज्यात महाराष्ट्र पोलिसांसमोर (Maharashtra Police)  सध्या या गुन्हेगारीला रोखण्याचं मोठ्ठं आव्हान असणार आहे. कारण आज राज्यात ज्या तीन घटना घडल्यात या घटनेवरुन कायद्याचा धाक कुणाला राहिलाय की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये काही अज्ञातांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर नवी मुंबईत चड्डी बनियन गँगची दहशत पहायला मिळतेय. तर तिकडे डोंबिवलीमध्ये हातात तलवार घेऊन काहींनी दहशत परवलीये. त्यामुळे या टवाळखोरांना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येतेय. 

पनवेल तालुक्यात अनेक दिवसांपासून एकाचवेळी अनेक घरात चोरांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले होते. अशातच खारघर वसाहतीलगत असणाऱ्या पेठ गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियानधारी टोळीतील चौघेजण फिरताना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या टोळीने पेठ गावात अनेक घरात चो-या केल्या आहेत. तसेच पायात चप्पल न घालता, अंगावर शर्ट न घालता बनियानवर चोरी करण्यासाठीचे साहित्य आणि हातामध्ये कोयता घेऊन या टोळीतील घरफोडी करणारे चोर राजरोस फिरत आहेत. पनवेल मध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढूनही पोलीसांना चड्डी बनियान टोळीला अटक करण्यात यश आलेले नाही.

डोंबिवलीमध्ये तलवार गँग सक्रिय

डोंबिवलीमध्ये तलवार गँग सक्रिय झाली आहे. डोंबिवलीतील आजदेपाडा परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भराडी माता इमारतीच्या आवारात काही चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले असता रहिवाशांनी आरडाओरडा केल्याने   चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.  चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाले असून चोरट्यांच्या हातामध्ये तलवारी दिसून येत आहेत. त्यामुळे डोंबिवली आजदेपाडा आजदेगाव आणि परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत.

पिंपरी- चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस

पिंपरी- चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस सुरूच आहे. मध्यरात्री कोयता गँगचा टवाळखोरांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. तापकीर चौकाजवळ घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. त्या आधारे वाकड पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहे. याआधी सुद्धा कोयता गॅंगने अनेकदा वाहनांची तोडफोड केलीये.

हे ही वाचा :

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

                                 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Kambli Love Story : रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण
भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
Ind vs Aus 2nd Test Travis Head : सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखलSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्रीOpposition Left MLA Oath Ceremony : आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु होताच विरोधकांकडून सभात्याग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Kambli Love Story : रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण
भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
Ind vs Aus 2nd Test Travis Head : सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
आता प्रति सरकार बनवा, शरद पवारांना 6 महिने पंतप्रधान करा, तर उरलेली  साडेचार वर्ष राहुल गांधींना द्या, पडळकरांचा खोचक टोला  
आता प्रति सरकार बनवा, शरद पवारांना 6 महिने पंतप्रधान करा, तर उरलेली साडेचार वर्ष राहुल गांधींना द्या, पडळकरांचा खोचक टोला  
Mithali Raj on Her Marriage : 'मला आवडतो त्याचं लग्न झालंय', वयाच्या 42व्या वर्षी अजूनही सिंगल, मिताली लग्नाबद्दल नेमकं म्हणाली तरी काय?
'मला आवडतो त्याचं लग्न झालंय', वयाच्या 42व्या वर्षी अजूनही सिंगल, मिताली लग्नाबद्दल नेमकं म्हणाली तरी काय?
Eknath Shinde : मंत्रिपदांवरून चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता!
मंत्रिपदांवरून चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता!
Embed widget