एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pune Koyata Gang: पुण्यातील वडगावशेरी परिसरात गुंडाने धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पुणे :  पुण्यात कोयता गँगला (Pune Koyata Gang)  पोलिसांचा धाक उरला नाहीये हे पुन्हा एकदा समोर आलंय.  काल सिंहगड रोडवर  आता  वडगावशेरीच्या गणेशनगर कोयता गँगची दहशत पहायला मिळाली. पुण्यात कोयता टोळीने पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये ही घटना घडली. 6 कार, 4 रिक्षा, 3 दुचाकी आणि इतर वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली. गुंडाने धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

वडगावशेरीच्या गणेशनगर परिसरात काल कोयता टोळीच्या गुंडाने धुमाकूळ घालत हातामध्ये कोयते आणि दगड घेत वाहनांची तोडफोड करत  वाहनांची तोडफोड केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.  सलग पुण्यात दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याने पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. कालच सिंहगड रस्त्यावरील क्रिकेट वाडी या ठिकाणी कोयता टोळीने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर मध्यरात्री चंदननगर परिसरातील वडगावशेरीत वाहनांची कोयता टोळीने तोडफोड केली आहे..

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर दहा ते पंधरा गुंडांचा तरुणावर हल्ला

पुण्यातील किरकटवाडी परिसरात काल संध्याकाळी 7.30 ते 9 च्या दरम्यान दहा ते पंधरा गुंडांनी हवेत कोयते फिरवून आणि दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या टोळक्याने नागरिकांना जखमी करण्याचा प्रयत्न केला असून या घटनेत दगड डोक्याला लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.  हवेली पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतलं असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्य आरोपी आणि इतर सात आरोपींवर कलम 307, 354,323, 324, 143 आणि इतर कलमांतर्गत हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

पुण्यात कोयता गँगचा धुडगूस

 गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगचा धुडगूस पाहायला मिळतोय.   गेल्या काही महिन्यांपासून गल्ली पासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा  पुण्यातील "कोयता गँग". पुणे शहरातील अनेक भागात तरुणांच्या टोळ्या हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. खंडणी वसूल करणे, धमकावणे, दहशत निर्माण  करण्यासाठी शहरातील अनेक भागात हे तरुण हातात कोयते घेऊन फिरताना दिसतायत. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहेच शिवाय व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता आहे. 

हे ही वाचा :

पोर्शे अपघात: लाडोबासाठी कोर्टात हायप्रोफाईल वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयाचे सरकारवर ताशेरे


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Embed widget