राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर, राजकीय चर्चेला उधाण
Nationalist Congress Party : मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे एकापाठोपाठ एक भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावण्यात आल्याचं पाहिला मिळालं आहेत.
Nationalist Congress Party : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयासमोर भावी मुख्यमंत्री या आशयाचे नेत्यांचे पोस्टर लावण्याचा सिलसिला आज देखील सुरु असल्याचं पाहिला मिळालं होतं. जयंत पाटील, अजित पवार यांच्यानंतर आज सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर झळकले. नेमका काय आहे प्रकार पाहुयात..
आधी जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा पोस्टर लावण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा पोस्टर लावण्यात आला. आणि आता पहिल्या महिला मुख्यमंत्री असा सुप्रिया सुळे यांचा पोस्टर झळकला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे एकापाठोपाठ एक भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावण्यात आल्याचं पाहिला मिळालं आहेत. त्यामुळे पक्षात आत्तापासूनच रस्सीखेच सुरु तर झाली नाही ना अशी चर्चा रंगू लागली होती..
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 16 फ्रेब्रुवारी रोजी मुंबईतील नेपियन्स रोड परिसरात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे जयंत पाटील यांचे पोस्टर लावण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे पोस्टर कुणी लावले, त्या कार्यकर्त्याचे नाव देखील खाली लिहिण्यात आले होते. पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पोस्टर खाली कुणाचे नाव लिहिण्यात आले नाही.
सलग तीन महत्त्वाचे नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आल्यामुळे सोशल मीडियात प्रमुख नेत्यांमध्ये आगामी काळातील राजकारणाचा कानोसा घेत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच तर सुरु नाही ना ? अशी चर्चा जोरदार रंगू लागली होती. माध्यमांनी देखील या घटनेची दखल घेत काही पक्षात काही आलबेल तर नाही ना अशी शंका उपस्थित केली होती. या सगळ्या घटनेची गांभीर्याने दखल घेत अखेर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्यावतीने जाणीवपूर्वक अज्ञाताकडून हा संपूर्ण प्रकार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आणि कार्यालयाच्यावतीने तत्काळ पोलीस ठाण्यात आज्ञाताविरोधात सीसीटीव्ही फुटेज सह तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला असता या प्रकरणी माहिती घेण्यात येत असून विरोधी पक्षाचं तर हे काम नाही ना अशी शंका मनात येत असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवाय लवकरच पोलीस तपासात हे कृत्य कुणाचं आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे हे देखील उघड होईल असं ही सांगण्यात आलं आहे.
आणखी वाचा :
Supriya sule : भावी महिला मुख्यमंत्री बॅनरवरुन सुप्रिया सुळे कडाडल्या; म्हणाल्या महिलेचा फोटो...