एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर नाशिक झेडपीत शिवसेना-राष्ट्रवादी युती?

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पवित्र्यामुळे जिल्हा परिषदेतलं राजकारण चर्चेत आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला दूर ठेवून नाशकात शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्याची चिन्हं आहेत. जिल्हा पातळीवर भाजप वगळता शक्य त्या पक्षाचा झेडपी अध्यक्ष बसवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. संख्याबळाचा विचार केला तर नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना 25 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र राष्ट्रवादी किंवा भाजपशी युती केल्याशिवाय त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही.
झेडपीत भाजपला रोखणार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र!
शिवसेना नेते आणि संपर्कप्रमुखांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. त्यामुळे सेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन शिवसेनेला बाजूला ठेवण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाचा अध्यक्ष बसतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. नाशिक जिल्हा परिषद संख्याबळ - एकूण जागा 73 मॅजिक फिगर 37 पक्षीय बलाबल शिवसेना - 25, राष्ट्रवादी - 18, भाजप -15, काँग्रेस - 8, माकप - 3, अपक्ष आणि इतर 4 महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेना भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे.Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















