एक्स्प्लोर

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी नाशिक पालिकेच्या चौकशीत संभाजी भिडे दोषी

काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने संभाज भिडेंना या प्रकरणात नोटीसही पाठवली होती. मात्र भिडेंनी नाशिक महापालिकेने पाठवेलली नोटीस स्वीकारली नव्हती.

नाशिक : माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा करणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नाशिक महापालिकेच्या प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी समितीच्या चौकशीत दोषी आढळले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने समिती स्थापन करुन, संबंधित प्रकरणाची चौकशी केली होती. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी समितीच्या चौकशीत संभाजी भिडे दोषी आढळल्याने, आता समिती भिडेंविरोधात न्यायालयात जाऊन आपला अहवाल सादर करेल. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत असलेल्या कलम-22 चा भिडेंनी भंग केल्याचा दावा या समितीने केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने संभाजी भिडेंना या प्रकरणात नोटीसही पाठवली होती. मात्र भिडेंनी नाशिक महापालिकेने पाठवेलली नोटीस स्वीकारली नव्हती. त्यामुळे आता संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. काय होतं संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य? माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं. भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला. संभाजी भिडे म्हणाले की, "भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे." भिडेंच्या आंब्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस "माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं. भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला. संभाजी भिडे यांच्या या विधानाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. आंब्याचा आधार घेत विनोदांचा वर्षाव अक्षरश: सुरु आहे. नेटकऱ्यांच्या फेसबुकीय प्रतिभेला जणू धुमारेच फुटले आहे. भिडेंच्या विधानावर कोण चांगला विनोद करतो, ह्याची चढाओढच सुरु आहे. इतकंच नाही तर 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील पारु अर्थात लक्ष्याच्या आंबा खाऊन गरोदर झाल्याचा सीनही भिडेंच्या विधानानंतर पुन्हा शेअर केला जात आहे. संबंधित बातम्या : 'त्या' वक्तव्याची नाशिक पालिकेकडून दखल, संभाजी भिडेंची चौकशी होणार माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली : संभाजी भिडे भिडेंच्या आंब्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस भिडे गुरुजी आजचे ‘बाजीप्रभू’, आम्ही त्यांच्यासोबत : शिवसेना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
Gold Rate Update : सोने दरात MCX वर तेजी पण सराफा बाजारात घसरण, 300 पासून 650 रुपयांपर्यंत दर घसरले
सोने दरात मोठी घसरण, चांदीचे दरही घसरले, MCX अन् सराफा बाजारात वेगळं चित्र
थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
Jitendra Awhad : बीड, परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत रोखठोक भूमिका, आता जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांच्या वक्तव्याची चिरफाड; म्हणाले...
बीड, परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत रोखठोक भूमिका, आता जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांच्या वक्तव्याची चिरफाड; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC FULL : जिल्ह्याला पोलीस प्रमुख म्हणून आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा - सुरेश धसDevendra Fadnavis Full  : Beed मध्ये काय घडलं, Parbhani राड्याचं काय झालं, सभागृहात सगळं सांगितलंSanjay Raut Full PC : आमच्यावर हल्ला करण्यासाठी 100 बाप खाली यावे लागतील - संजय राऊतNagpur Crime : पायावर लोटांगण घेत माफी मागण्यास भाग; दहशतीसाठी व्हिडीओ व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
Gold Rate Update : सोने दरात MCX वर तेजी पण सराफा बाजारात घसरण, 300 पासून 650 रुपयांपर्यंत दर घसरले
सोने दरात मोठी घसरण, चांदीचे दरही घसरले, MCX अन् सराफा बाजारात वेगळं चित्र
थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
Jitendra Awhad : बीड, परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत रोखठोक भूमिका, आता जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांच्या वक्तव्याची चिरफाड; म्हणाले...
बीड, परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत रोखठोक भूमिका, आता जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांच्या वक्तव्याची चिरफाड; म्हणाले...
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात; बस दरीत कोसळून 5 जण ठार
ताम्हिणी घाटात भीषण अपघात; बस दरीत कोसळून 5 जण ठार
भुजबळांनंतर अजित पवारांचा आणखी एक आमदार नाराज; मंत्रिपद न मिळाल्याने अधिवेशन सोडून परतले
भुजबळांनंतर अजित पवारांचा आणखी एक आमदार नाराज; मंत्रिपद न मिळाल्याने अधिवेशन सोडून परतले
Marathi family beaten in Kalyan: मोठी बातमी: मुजोर अखिलेश शुक्लाचं निलंबन, मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा, मराठी कुटुंबाला मारहाणप्रकरणी कारवाई
माज उतरवू, अखिलेश शुक्लाचं निलंबन, मराठी माणसावरचा अन्याय खपवून घेणार नाही, फडणवीसांनी ठणकावून सांगितलं
Devendra Fadnavis : मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांचा 4 वाजता फोन, कोम्बिंग ऑपरेशनबाबत IG सोबत कॉन्फरन्स कॉल, फडणवीसांनी सगळं सांगितलं!
प्रकाश आंबेडकरांचा 4 वाजता फोन, कोम्बिंग ऑपरेशनबाबत IG सोबत कॉन्फरन्स कॉल, फडणवीसांनी सगळं सांगितलं!
Embed widget