एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Municipal result Live : नाशकात भाजपचा मनसेला क्लीन स्वीप
नाशिक: नाशिकमध्ये भाजपने निर्विवाद सत्ता काबीज केली आहे. 122 पैकी 67 जागा जिंकत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नाशिकमधून राज ठाकरेंच्या मनसेचा सुपडा साफ झाला आहे. 39 जागा मिळवून गेल्या वेळी सत्तेत असलेल्या मनसेला यावेळी केवळ एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच म्हणजेच अवघ्या पाच जागा मिळाल्या आहेत.
नाशिकमध्ये 67 जागा जिंकून भाजप नंबर वन ठरला आहे, तर शिवसेना 34 जागा मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत. मनसे घसरगुंडी होऊन पाचव्या स्थानावर गेली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला गर्दी करणाऱ्या जनतेने मतपेटीत मत त्यांच्या बाजुने टाकलेलं नाही. त्यांच्या व्हिजन आणि प्रेझेंटेशनला नाशिककरांचा कौल मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग आहे. एकूण 31 प्रभागात 122 सदस्य निवडून आले आहेत. (29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय असणार)
- भाजप 67,
- शिवसेना 34,
- काँग्रेस 6,
- राष्ट्रवादी 6,
- मनसे 5,
- इतर 5
- नाशिकचे महापौर, मनसेच्या अशोक मुर्तडक यांचा विजय
- नाशिक महापालिकेत भाजपची बहुमताकडे वाटचाल, 50 जागांवर विजय निश्चित, बहुमताच्या आकड्यापासून 12 जागा दूर
- राज ठाकरेंचे निकटवर्तीय, नाशिक मनसेचे गटनेते, विद्यमान नगरसेवक अनिल मटाले यांचा दारुण पराभव, प्रभाग 25 मध्ये शिवसेनेच्या श्यामकुमार साबळेंकडून पराभव
- शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप यांच्या मुलीचा पराभव, भाजपच्या कोमल मेहेरोलियाकडून तनुजा घोलप पराभूत
- प्रभाग 4 मध्ये भाजपने चारही जागा जिंकल्या
- नाशिक - मनसेचे माजी महापौर यतिन वाघ यांना पराभवाचा धक्का
- नाशिकमध्ये भाजपची मुसंडी, 18 जागांवर आघाडी,शिवसेना 5, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2 मनसे 1 जागी आघाडीवर
- भाजप एका जागेवर आघाडीवर
- नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार आघाडीवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रीडा
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement