एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा, स्वत: तुकाराम मुंढे सहभागी
महापालिकेच्या माध्यमातून पालखीच्या स्वागतावर खर्च करण्यास मनपा आयुक्तांनी नकार दिल्याने प्रस्थानाआधीच पालखी वादात सापडली होती. त्यामुळे तुकाराम मुंढेंवर सर्वस्तरातून टीका झाली होती.
नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यावरुन सुरु झालेल्या वादावर मनपा आयुक्त तुकारम मुंढे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढेंनी स्वत: पालखीचे दर्शन घेत फोटो सेशन करत वारकरी मंडळींसोबत वेळ घालवला.
महापालिकेच्या माध्यमातून पालखीच्या स्वागतावर खर्च करण्यास मनपा आयुक्तांनी नकार दिल्याने प्रस्थानाआधीच पालखी वादात सापडली होती. त्यामुळे तुकाराम मुंढेंवर सर्वस्तरातून टीका झाली. तरीही मुंढेंनी आपल्या भूमिकेत बदल केला नाही.
अखेर दरवर्षी महापालिकेच्या जलतरण तलवाच्या आवारात महापौरांच्या हस्ते होणाऱ्या स्वागताची परंपरा खंडीत झाली आणि पंचायत समितीच्या आवारात पालखीचे स्वागत करण्यात आले.
महापालिकेची वास्तू असतानादेखील पंचायत समितीमध्ये स्वागत झाल्यान नाराजी व्यक्त होते आहे. मनपा आयुक्तांनी डॅमेज कंट्रोलसाठी पालखीचे दर्शन घेतले. सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवण्यासाठी खर्च न करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला, तर भाजपने आयुक्तांच्या परंपरा खंडीत करण्याच्या परंपरेचा समाचार घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement