एक्स्प्लोर

Nashik Oxygen Leak : नाशिक ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची माहिती

नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. 

नाशिक : नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.  राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.

व्हेंटिलेटरवर असलेल्य़ा रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं मांढरे यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, ही एक खाजगी कंपनीची टाकी आहे. रिफिल करण्याकरता आणि मेंटेनन्सकरता टॅंकर आला होता.  त्यात काही टेक्निशियन्स होते. तो टॅंकर रिफिल करण्यात आला होता, असं आयुक्तांनी सांगितलं, मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या विस्कळीतपणामुळं ही घटना घडली, असं जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितलं. याबाबत सर्व माहिती शासन स्तरावर माहिती कळवली आहे, असं त्यांनी सांगितलं. 

या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता पोलीसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं.  

दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

वॉल्वमध्ये लीकेज असल्याने गळती : राजेश टोपे
स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार? : प्रवीण दरेकर
नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्दैवी आहे. ही सर्वस्वी सरकारची चूक आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. तसचं निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार असा सवालही विचारला. दरम्यान जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारचे मंत्री ट्रम्पच्या दरबारात जाऊन भीक मागतात, 2 तारखेला व्यापार युद्ध सुरु झालं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम होईल: पृथ्वीराज चव्हाण
मोदींनी ट्रम्पसमोर लोटांगण घातलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम; पृ्थ्वीराज चव्हाणांचा धोक्याचा इशारा
Shivaji Kardile: 'माझंही पुर्नवसन करा' सुजय विखे पाटील यांच्या मागणीवरुन शिवाजी कर्डिले यांचे सूचक वक्तव्य; राज्यात नव्हे तर केंद्रात वर्णी?
'माझंही पुर्नवसन करा' सुजय विखे पाटील यांच्या मागणीवरुन शिवाजी कर्डिले यांचे सूचक वक्तव्य; राज्यात नव्हे तर केंद्रात वर्णी?
Sanjay Raut : राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते, नरेंद्र मोदींनाही जावं लागेल; संजय राऊतांनी RSS चा नियम सांगत दिले महत्त्वाचे संकेत
राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते, नरेंद्र मोदींनाही जावं लागेल; संजय राऊतांनी RSS चा नियम सांगत दिले महत्त्वाचे संकेत
मधुमेह रुग्णांसाठी आंबा हानिकारक ठरू शकतो का?
मधुमेह रुग्णांसाठी आंबा हानिकारक ठरू शकतो का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 01 April 2025Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 01 April 2025 : ABP Majha : 10 AMABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 01 April 2025Satish Bhosale Khokya News : 'खोक्या' प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या हत्येचा कट, सुरेश धसांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी सरकारचे मंत्री ट्रम्पच्या दरबारात जाऊन भीक मागतात, 2 तारखेला व्यापार युद्ध सुरु झालं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम होईल: पृथ्वीराज चव्हाण
मोदींनी ट्रम्पसमोर लोटांगण घातलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम; पृ्थ्वीराज चव्हाणांचा धोक्याचा इशारा
Shivaji Kardile: 'माझंही पुर्नवसन करा' सुजय विखे पाटील यांच्या मागणीवरुन शिवाजी कर्डिले यांचे सूचक वक्तव्य; राज्यात नव्हे तर केंद्रात वर्णी?
'माझंही पुर्नवसन करा' सुजय विखे पाटील यांच्या मागणीवरुन शिवाजी कर्डिले यांचे सूचक वक्तव्य; राज्यात नव्हे तर केंद्रात वर्णी?
Sanjay Raut : राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते, नरेंद्र मोदींनाही जावं लागेल; संजय राऊतांनी RSS चा नियम सांगत दिले महत्त्वाचे संकेत
राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते, नरेंद्र मोदींनाही जावं लागेल; संजय राऊतांनी RSS चा नियम सांगत दिले महत्त्वाचे संकेत
मधुमेह रुग्णांसाठी आंबा हानिकारक ठरू शकतो का?
मधुमेह रुग्णांसाठी आंबा हानिकारक ठरू शकतो का?
Ready Reckoner Rate : घरांचे भाव वाढणार, रेडी रेकनर दरात 4.39 टक्क्यांची वाढ, कोणत्या जिल्ह्यात रिअल इस्टेटचे भाव उसळी घेणार?
घरांचे भाव वाढणार, रेडी रेकनर दरात 4.39 टक्क्यांची वाढ, कोणत्या जिल्ह्यात रिअल इस्टेटचे भाव उसळी घेणार?
पॅरोलवर सुट्टी संपली, तुरुंगात परतण्याआधीच तरुणानं प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल, ‘लिव्ह इन रिलेशनशिप'चा भयंकर शेवट
पॅरोलवर सुट्टी संपली, तुरुंगात परतण्याआधीच तरुणानं प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल, ‘लिव्ह इन रिलेशनशिप'चा भयंकर शेवट
Beed Crime: कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, बीड पोलिसांनी झटपट अंत्यविधीही उरकला, आता नवी अपडेट समोर
कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, झटपट अंत्यविधीही उरकला, नवी अपडेट समोर
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Embed widget