एक्स्प्लोर

Nashik Dengue Update : नाशिकमध्ये धोक्याची घंटा, 15 दिवसांत 200 डेंग्यूचे रुग्ण; महानगरपालिका फास्ट ट्रॅकवर कामाला

Dengue Update : नाशकात जुलै महिन्यात डेंगूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या पंधरा दिवसात दोनशे डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले असून महानगरपालिकेचे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय.

Nashik Dengue Update नाशिक : नाशिककरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नाशिक शहरामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झपाटणे वाढताना पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये मोठी वाढ होत होती, मात्र जून आणि जुलै महिन्यात डेंगूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळालीय. तर सध्या जुलै महिन्याच्या पंधरा दिवसात दोनशे डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले असून नाशिक (Nashik) महानगरपालिकेचे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. महानगरपालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाकडून विविध पथके नेमून शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. 

महानगरपालिका फास्ट ट्रॅकवर कामाला

यापूर्वीच्या सहा महिन्यात तब्बल 300 संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आले होते आणि  त्यातही जून महिन्यात तीनशे पैकी एकशे साठ रुग्ण बाधित होते. परिणामी केंद्राचे आरोग्य पथक नाशकात आले असता पथकालाही डेंगूच्या आळ्या आढळून आल्या होत्या. सध्या शहरात सर्वत्र डेंगूचे रुग्ण वाढत असून महापालिकेची यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. विविध भागात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर्सकडून तपासणी करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांनीही योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 पंधरा दिवसातच तब्बल 200 डेंग्यूचे रुग्ण

नाशिक शहरात आरोग्य व्यवस्था संपूर्णतः डळमळीत झाल्याचे चित्र आहे. साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावाने नाशिककर हैराण झाले आहे. जानेवारी 2024 पासून आजपर्यंत तब्बल 365 डेंग्यूचे (Dengue) रुग्ण आढळले आहेत.  तर सध्या जुलै महिन्याच्या पंधरा दिवसात दोनशे डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नाशिक महापालिकेला (Nashik NMC) डासांची उत्पत्ती स्थळे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात जुलै महिन्याच्या पंधरा दिवसातच तब्बल 200 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. नाशिक (Nashik) महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डासांची उत्पत्ती स्थळे सर्वाधिक असल्याचं निदर्शनास आले आहे. फ्रिज, झाडांच्या कुंड्या, घरांचे छत हे डासांचे प्रमुख उत्पत्ती स्थळे महापालिकेला मिळून आले आहेत. नागरिकांनी एक दिवस ड्राय डे पाळावा, असे आवाहन नाशिक मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

डेंग्यूला उत्पत्ती स्थळे आढळल्या प्रकरणी 98 हजारांचा दंड 

शहरातील सिडको व नाशिकरोड डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असून, येथे आठवड्याभरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वाढता धोका पाहता सहाही विभागात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात घरोघरी भेटी दिल्या जाणार असून, घरात व अवतीभोवती डेंग्यू डासांच्या अळ्या व उत्पत्तीसाठी पोषक वातावरण नाही ना, याची तपासणी केली जाणार आहे. संपूर्ण शहरात पंधरा दिवस ही मोहीम राबवली जात आहे. मलेरिया विभागाने बांधकाम प्रकल्प, झोपडपट्टी भाग यांसह विविध ठिकाणी भेटी देत डेंग्यूला उत्पत्ती स्थळे आढळल्या प्रकरणी 98 हजारांचा दंड आकारला आहे.  

डेंग्यूचा कहर

महिना       बाधित रुग्ण

जानेवारी        २२

फेब्रुवारी         ५

मार्च              २७

एप्रिल            १७

मे                 ३९

जून              १६१

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणारShivsena Uddhav Thackeray PC : भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, ठाकरेंची सडकून टीकाNashik Trimbakeshwar Kumbhकुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा?साधूमहंतांचं म्हणणं काय?Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
Embed widget