(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मान्सून वेळत दाखल! खरीप हंगाम फुलणार, बळीराजा सुखावणार, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीपाची लागवड होणार
मान्सून वेळेत दाखल झाल्याने यंदा खरीप हंगाम (kharip season) फुलणार आहे. दरम्यान यंदा नाशिक (Nashik) जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे 6 लाख 28 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे.
Agriculture News Nashik : राज्याच्या विविध भागात सध्या चांगला पाऊस (Rain) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेती (Agriculture) कामांना वेग आला आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्याने यंदा खरीप हंगाम (kharip season) फुलणार आहे. दरम्यान यंदा नाशिक (Nashik) जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे 6 लाख 28 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. पावसानं दमदार हजेरी लावल्यानं यंदा खरीपाचा हंगाम बळीराजासाठी आशादायक ठरणार आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी 2 लाख 20 हजार टन खतांचा साठा मंजूर
नाशिक जिल्ह्यासाठी नव्याने 2 लाख 20 हजार टन खतांचा साठा मंजूर झाला आहे. तर 71 हजार 243 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी जिल्ह्यात 6 लाख 26 हजार 190 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने खरीप हंगाम फुलणार आहे.
खरीप हंगामासाठी नाशिक जिल्ह्यात सुमारे 6 लाख 28 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर लागवड
नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे 6 लाख 28 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. पावसानं दमदार हजेरी लावल्याने खरिपाचा हंगाम बळीराजासाठी आशादायक ठरणार आहे. जिल्ह्याकरता नव्याने 2 लाख 20 हजार टन खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे. तर 71443 क्विंटल बियाणांची मागणी देखील करण्यात आली आहे. गतवर्षी जिल्ह्यात 6 लाख 26 हजार 190 हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पिकांची लागवड करण्यात आली होती. यंदा पाऊस वेळेत दाखल झाल्याने पुन्हा एकदा अशा पल्लवीत झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: