एक्स्प्लोर

बसच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; नाशकात दोन दिवसात वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेत तिघांचा मृत्यू

Nashik Accident News : नाशिक शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात शहरातील बसच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Nashik Accident News : नाशिक (Nashik) शहरात एक भीषण अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. यात शहरातील बसच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. आज, 10 जुलै रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास नाशिकरोड मालधक्का रोडवरील मनपा सिटी लिंक बस डेपोमध्ये ही अपघाताची घटना घडलीय. बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई (वय 5 वर्ष रा. नाशिकरोड) ही तिच्या आजोबांसोबत शाळेतून चहा टपरीवर जात होती. दरम्यान सिटीलींक बस चालकाने भरधाव वेगाने तिला मागून धडक दिली. 

या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तिचा जागेवर मृत्यू झालाय. तर तिच्या आजोबांचा जीव थोडक्यात बचावला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र या अपघाताने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून गेल्या दोन दिवसात ही तिसरी भीषण अपघाताची घटना आहे. तर आतापर्यंत अपघातांच्या घटनांमध्ये तिघांचा बळी गेला आहे. 

दोन दिवसात वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेत तिघांचा मृत्यू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असलेल्या हिट अँड रनच्या (Hit And Run) घटनांनी संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. त्यात पुणे पोर्शे कार अपघातानंतर (Pune Porsche Accident) मुंबईतील वरळी हिट अँड रनच्या (Worli Hit And Run Accident) घटनांनी काळजाचा ठोका चुकवला आहे. अशातच नागपुर (Nagpur), नाशिक सारख्या शहारांमध्येही या आपघातांच्या मालिकेने  सर्वांना हादरवून सोडलं आहे. अशातच आता नाशिक शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली असून यात एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय  

हाती आलेल्या माहितीनुसार, या अपघातात बस चालक हा मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तर सदर घटना परिसरात कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केलीय. त्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून गवई कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.    

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या पैशातून व्यवसाय, 10 दिवसात 10 हजार कमावले100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 सप्टेंबर 2024ABP Majha Headlines : 03.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 13 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
Ladki bahin yojana: लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
Ajit Pawar: अजित पवारांचे परतीचे सर्व दोर कापले, शरद पवार गटातील नेत्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
अजित पवारांचे परतीचे सर्व दोर कापले, शरद पवार गटातील नेत्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
Embed widget