एक्स्प्लोर

Nashik: मित्रांसोबतची सहल बेतली जीवावर! सुरगाण्यातील साखळचोंड धबधब्यावरुन कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू 

नाशिकमधील उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील शॉवर पॉईंट धबधब्यावर गेलेल्या गुजरातच्या विद्यार्थ्याचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

नाशिक: जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून सहलीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांचा पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील साखळचोंड धबधब्यावरुन विद्यार्थी दीड हजार फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. तक्षिल संजाभाई प्रजापती असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो गुजरातचा आहे.

सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन कोसळल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा तक्षिल संजाभाई प्रजापती हा दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील शॉवर पॉईंट धबधब्यावर अंघोळ करत होते. खडकावर शेवाळ असल्याने तक्षिल पाय घसरुन पंधरा फूट खाली खडकावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. यासाठी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह रस्त्यावर आणण्यात येऊन पाच वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यासाठी पोलिसांना स्थानिक गावकऱ्यांची मदत झाली.

पायाभूत सुविधांचा अभाव

पिंपळसोंड तातापाणी उंबरपाडा येथे अंबिकेची उपनदी भुतकुड्याच्या ओहोळावर  चिंचचोंड, गायचोंड, शेळूणे, साखळचोंड, शॉवर पॉईंट, वाहूटचोंड असे एकाखाली एक असे पाच ते सहा साखळी धबधब्यांची मालिका आहे. हा भाग गुजरात सीमेलगतचा घनदाट जंगल व्याप्त असल्याने गर्द झाडी, महाकाय वृक्ष, दुर्मिळ औषधी वनस्पतींनी बहरलेला अतिदुर्गम डांग भाग आहे. यामुळेच हा परिसर पर्यटकांना भुरळ घालत असतो. मात्र काळजीपूर्वक पर्यटन न केल्याने अनुचित प्रकार घडत आहेत. हा भाग वनविभागाच्या हद्दीत येत असला तरीही वनविभागाने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. यापुर्वीचे तत्कालीन उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दोन वेळा पाहणी केली होती. यावर आराखडा तयार करून सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नसून आता तरी वनविभागाने सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025Swargate Bus Crime : स्वारगेट प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 26 February 2025Swargate Bus Depo Crime : आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची आरोपीची तरुणीला धमकी, धक्कादायक माहिती समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
Embed widget