एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा आज भेटीगाठींचा सिलसिला; झिरवाळ, कंबोज, केरे पाटलांशी चर्चा, राजकीय घडामोडींना वेग

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज भेटीगाठींचा सिलसिला सुरु आहे. नरहरी झिरवाळ, मोहित कंबोज आणि रमेश केरे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी देखील वाढल्या असून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आणि भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kambhoj) आणि रमेश केरे पाटील यांनी भेट घेत घेतली. या भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात असेल तरी भेटी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

विधानसभा निवडणुकीमुळे आता सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीदेखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांची थेट उमेदवारी जाहीर केली. यावर शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता अचानक विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. 

नरहरी झिरवाळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 20 मिनिट चर्चा

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. नरहरी झिरवाळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 20 मिनिट चर्चा झाली. या भेटीबाबत नरहरी झिरवाळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मला उपमुख्यमंत्र्यांना भेटायचे असेल तर एक ठराविक काम नसते. माझे अनेक काम असतात, अनेक प्रश्न असतात. त्यामुळे त्यांची भेट घेतली की, सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

मोहित कंबोज आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात 

नरहरी झिरवाळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत निवासस्थानी मोहित कंबोज दाखल झाले. मात्र या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रमेश केरे पाटील फडणवीसांच्या भेटीला 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या बाहेर जवाब दो आंदोलन केले जाणार होते. मात्र, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश केरे पाटील यांच्यासह सर्व पदाधिकार्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात होते. यानंतर रमेश केरे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले आहेत. या भेटीत काय चर्चा होणार? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा

विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांचे मराठवाड्यातील आमदारांना आदेश, बैठकीत 'या' महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
Embed widget