Narendra Modi : तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, संजय राऊतांना पंतप्रधान मोदींच्या सदिच्छा; राऊतांनीही आभार मानले
Sanjay Raut Post : आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने दोन महिने आपण कुणालाही भेटू शकणार नाही, सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्येतीच्या कारणास्तव दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशी सदिच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केली आहे. मोदींच्या सदिच्छांवर संजय राऊत यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्ममातून कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. तब्येतीच्या कारणास्तव आपण दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहत आहोत. अचानक प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने बाहेर पडणे आणि गर्दीत मिसळण्यावर मर्यादा आल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं.
'वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे, मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या' अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.
Narendra Modi Post On Sanjay Raut : मोदींची पोस्ट
संजय राऊत यांची पोस्ट रिशेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संजय राऊतांना सदिच्छा दिल्या. 'आपली तब्येत लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना करतो' अशी सदिच्छा नरेंद्र मोदींनी दिली.
Praying for your speedy recovery and good health, Sanjay Raut Ji.@rautsanjay61 https://t.co/nGgRFO4AhS
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2025
Sanjay Raut On Narendra Modi : राऊतांचे आभार
नरेंद्र मोदींनी दिलेल्या सदिच्छांवर संजय राऊत यांनी आभार मानले. 'माझा परिवार आपला आभारी आहे' अशा शब्दात संजय राऊत यांनी आभार मानले.
आदरणीय प्रधान मंत्री जी धन्यवाद!
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
मेरा परिवार आपका आभारी है!
जय हिंद
जय महाराष्ट्र! https://t.co/4ssaEKNaMh
Sanjay Raut Health Condition : आम्ही सगळे आपली वाट बघत आहोत..!
सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, लवकर बरे व्हा.. आम्हाला कल्पना आहे की सार्वजनिक रित्या जरी आपण मिसळू शकणार नसलात तरी सुद्धा इथल्या पाताळयंत्री अजस्त्र महाकाय शक्ती विरोधात जी लढाई आपण उभी केलेली आहे ; त्या लढाईला वैचारिक रसद या दोन महिन्यात सुद्धा आपण पुरवत राहणार आहात...
ही बातमी वाचा:
























