एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav: भाजपच्या महिला आमदार भास्कर जाधवांना म्हणाल्या, 'जय श्रीराम' बोला; राहुल नार्वेकरांनी झापलं, म्हणाले, तुम्ही पहिल्या रांगेत बसल्या म्हणजे...'

Bhaskar Jadhav on Devayani Farande: विधानसभेत 'हायव्होल्टेज' ड्रामा! भास्कर जाधवांच्या भाषणात देवयानी फरांदेंचा हस्तक्षेप; विधानसभा अध्यक्षांनी कडक शब्दात सुनावले.

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) मनरेगाच्या मुद्द्यावर आक्रमक भाषण करत असताना भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फरांदे यांची चांगलीच कानउघडणी केली.

नेमका वाद काय?

सभागृहात भास्कर जाधव हे मनरेगा योजनेतील मजुरांच्या थकीत पगारावरून सरकारला धारेवर धरत होते. मजुरांचे पैसे चार-चार वर्षे का रोखले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी 'जीरामजी' (GR) या शब्दाचा उल्लेख करत "तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का?" अशी मिश्किल टिप्पणी केली.

यावर सत्ताधारी बाकांवरील देवयानी फरांदे संतापल्या आणि त्यांनी पहिल्या बाकावर येऊन बसत भास्कर जाधव यांना "जय श्रीराम बोला" असा आग्रह धरला. त्यांनी जाधवांच्या भाषणात वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्षांनी टोचले कान

देवयानी फरांदे पहिल्या रांगेत येऊन बसल्याने आणि तिथून गोंधळ घालत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना कडक शब्दात सुनावले. "फरांदे ताई, जागेवर जाऊन बसा. तुम्ही पहिल्या रांगेत येऊन बसलात म्हणजे तुम्हाला पहिल्या रांगेचे अधिकार मिळालेले नाहीत. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा," अशा शब्दात नार्वेकरांनी त्यांना फटकारले.

भास्कर जाधवांचा पलटवार

अध्यक्षांनी फरांदे यांना सुनावल्यानंतर भास्कर जाधवांनीही टोला लगावला. ते म्हणाले, "मॅडम, तुमच्याकडून शिक्षण घेण्याची माझी प्रज्ञा नाही. तुमची विद्वत्ता एवढी मोठी आहे की ती मला परवडणारी नाही". त्यानंतर मजुरांच्या प्रश्नावर सरकार उत्तर देत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभागृहातून वॉकआउट केले .

या गोंधळानंतर संबंधित मंत्र्यांनी स्पष्ट केले की, केंद्राकडून निधी प्राप्त झाला असून येत्या एका महिन्यात सर्व मजुरांची देणी पूर्ण केली जातील. सरकार मजुरांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून विरोधक केवळ राजकारण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget