एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापुरात रोडरोमिओंना उठाबशांची शिक्षा
कोल्हापूर : कोल्हापुरातील महाविद्यालयाच्या बाहेर रोमियोगिरी करणाऱ्या आणि कारण नसताना घुटमळणाऱ्यांना पोलिसांनी आज चांगलीच अद्दल घडवली. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने तरुणांचे धाबे दणाणले आहेत.
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील निर्भया पथकाने कोल्हापूर शहरात आणि महाविद्यालय परिसरात कारवाई करत रोमियोगिरी करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला. बगीचा, महाविद्यालय परिसरात रोमियोगिरी करणाऱ्या टोळक्यावर ही कारवाई केली.
बाईकवरून येरझाऱ्या मारणाऱ्या तसंच टवाळकी आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या पथकाने टार्गेट केल होतं. विद्यार्थ्यांचे आयकार्ड तपासणी केली असता, अनेक जण संबधित महाविद्यालयात शिक्षण घेत नसल्याचे उघड झाले. त्यामुळे अशांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले यावेळी त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. शिवाय, त्यांच्या पालकांना याबाबतची माहिती देण्यात आली.
पोलिसांची कारवाई सुरू झाल्यानंतर अनेकांनी प्रसंगावधान राखून पळ काढला. त्यापैकी काहींना ताब्यात घेण्यात यश आलंय. अशी कारवाई वारंवार झाली पाहिजे अशी मागणी आता पालकवर्गातून होते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement