एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडल्याची चिन्हं
भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी जोरदार विरोध केल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख पुढे ढकलली गेल्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे. राणेंच्या कथित भाजप प्रवेशाला भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी जोरदार विरोध केल्यामुळे प्रवेशाची तारीख पुढे ढकलली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
27 ऑगस्टला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला?
काँग्रेसी वातावरणाला कंटाळलेल्या, त्याचप्रमाणे नितेश आणि निलेश राणेंच्या राजकीय भवितव्याची तरतूद म्हणून राणेंसाठी भाजप हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं सध्या बोललं जात आहे. राणे भाजपमध्ये आल्यास त्याचा भाजपला किती फायदा होईल याचीही चाचपणी भाजपकडून गेले काही दिवस सुरु होती.राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!
दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळ पडल्यास त्यांचं सार्वजनिक बांधकाम खातं नारायण राणेंना देण्याची तयारी दाखवली आहे. “राणेसाहेब भाजपमध्ये आले, तर आम्ही त्यांचं स्वागतच करु. पण राणेसाहेबांनी निर्णय घेतला आहे की नाही, ते माहित नाही. हा निर्णय इतका मोठा आहे, कारण राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला पक्षात घेणं, हा मोठा निर्णय असल्याने केंद्रीय स्तरावर अमितभाईच हा निर्णय घेत आहेत.” असं चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. संबंधित बातम्या :गडकरींवर स्तुतिसुमनं, नारायण राणे भाजपच्या वाटेवर?
अहमदाबादमध्ये अमित शाह-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, राणेही अहमदाबादमध्येच?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
क्राईम
क्रीडा
Advertisement