(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narayan Rane on Maratha Reservation : तर राज्यात असंतोष हाईल, राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही; अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध
Narayan Rane on Maratha Reservation : ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
Narayan Rane on Maratha Reservation : मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी…
— Narayan Rane (@MeNarayanRane) January 28, 2024
नारायण राणे यांनी केलेल्या थेट विरोधाने राज्य सरकार कुणबी प्रमाणपत्रासाठी दिलेल्या अध्यादेशाने कोंडीत पडण्याची चिन्हे आहेत. नारायण राणे यांनी केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या नाराजीला बळ मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, घटनातज्ज्ञांकडून अध्यादेशावर साशंकता व्यक्त केली असून पुन्हा कायदेशील लढाई अटळ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यात यश आलं असलं, तरी पुढील लढाई अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत.
ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, भुजबळांना विरोध सुरुच
दुसरीकडे, ओबीसींमध्ये आरक्षण (OBC Reservation) संपल्याची भावना झाल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याची गरज काय?जर वेगळे आरक्षण देणार असाल, तर त्याला आमचा पाठींबा असेल, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मनोज जरांगेंच्या सगेसोयऱ्यांसह प्रमुख तीन मागण्या सरकारने मान्य केल्या. मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंच्या मागणीला शनिवारी तीव्र विरोध केल्यानंतर आजही विरोधाची धार कायम ठेवली.
कालच्या प्रकारानंतर मागासवर्गीय, दलित आणि इतर लोकांचे मेसेज येत आहे. पुढे काय करायचे विचारत आहे. आमचं आरक्षण संपलं अशी घबराट आहे. शिक्षण आणि नोकरीत समावेश होतोय. इतर ठिकाणीही वाटेकरी होणार आहेत. पंचायतीत एक, दोन जण निवडून येत होते आता ते पण जाणार अशी भीती ते व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, त्यांच्या भूमिकेपासून त्यांच्याच पक्षातील प्रफुल पटेल यांनी पक्षाची भूमिका नाही, म्हणत हात झटकले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या