एक्स्प्लोर

खा. हिना गावितांवरील हल्ल्याचा निषेध, नंदुरबारमध्ये कडकडीत बंद

या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नंदुरबार : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिना गावितांवर आंदोलकांनी हल्ला केला होता. यात सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेवेळी त्या प्रचंड घाबरल्या होत्या. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी आदिवासी भागात पसरली. नवापूरला तर रात्री नागपूर-सुरत महामार्ग बंद पाडण्यात आला होता. सोमवारी सकाळपासूनच नंदुरबार आणि नवापूरमध्ये बंदचा परिणाम दिसून आला. अनेक शाळांनी अघोषित शाळा बंद ठेवल्या. यावेळी जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. शिवाय लोकप्रतिनिधिंनाही लक्ष्य केलं जात आहे. हिना गावित यांनाही याचाच फटका बसला. त्या काल धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन जात असताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर चढून काचा फोडल्या. हिना गावित यावेळी स्वतः गाडीमध्ये होत्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही करावा लागला. शिवाय पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतलं. या घटनेचे पडसाद आज पाहायला मिळत आहेत. हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार आहेत. आदिवासी समाजातील मोठे नेते विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Embed widget