Nanded News : अमेरिकन डॉलर्सचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी गजाआड, नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
तेलंगणातुन आलेल्या या टोळीच्या ताब्यातून एक बिलियन डॉलरच्या बनावट नोटांसह कार आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
Nanded News : अमेरिकन डॉलर्सचे आमिष दाखवून त्याच्या बदल्यात भारतीय चलन घेऊन फसवणूक करणारी तेलंगणा राज्यातील टोळीला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तेलंगणा राज्यातून आलेली ही टोळी बिलियन डॉलर्सच्या चलणी नोटांचे आमिष दाखवून लूटण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या डॉलर्सच्या मोबदल्यात भारतीय चलन घेऊन, चलन देणाऱ्यांवर हल्ला करून रक्कम पळवण्याचे काम ही टोळी करत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. या टोळीकडून एक बिलियन डॉलर म्हणजे तब्बल भारतीय चलनातील साडेसातशे कोटी रुपयांच्या अमेरिकन चलनातील बनावट नोटा आणि कार, आदी रोख साहित्य असा अकरा लाख बावन्न हजार तीनशे पन्नास रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकदास चिखलीकर यांच्या पथकाने काल सायंकाळी गुरुद्वारा परिसरात केलीय.
मंगळवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकदास चिखलीकर यांचे पथक शासकीय वाहनातून नांदेड शहरात गस्तीसाठी कामी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत होते. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरुद्वारा गेट नंबर एकच्या बाजूला बडपूरा येथे एर्टीगा कार क्रमांक TS 17 G 2045 मध्ये तेलंगणा स्टेटचे पाच संशयित तरुण असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान हे भामटे गाडीच्या खाली उतरून लोकांना जवळ बोलावून त्यांच्याकडे अमेरिकन "एक बिलियन डॉलर्सची नोट असून ती तुम्ही घ्या आणि आम्हाला पन्नास लाख रुपये देऊन बाकीचे पैसे तुम्हीच घ्या" असे म्हणत असल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी सापळा रचत या टोळीला अटक केले. पण यातील दोघेजण गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. यात महेश इल्लय्या वेल्लुटला (वय 30), नंदकिशोर गालरेड्डी देवारम (वय 42), आणि आनंदराव आयात्रा गुंजी (वय 32) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
बनावट अमेरिकन डॉलर्स
अधिक चौकशी केली असता एक बिलियन डॉलरची संबधित नोट नकली असून ती लोकांना खरी म्हणून द्यायची आणि त्यांचे पैसे घेऊन झालेकी त्यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांचे पैसे घेऊन पळून जायचे अशा इराद्याने या ठिकाणी थांबले असल्याचे त्यांनी सांगितले. या भामट्यांकडून मोबाईल हँडसेट, एक चाकू, एर्टीगा कार असा 11 लाख 52 हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यात पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात या टोळीयुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा-
- Parbhani Crime : वाळू माफियांकडून शेतकऱ्याचा खून, 8 दिवस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, स्वतः पोलीस अधीक्षकांनी गुन्हा नोंदवून घेतला
- गुजरातहून बोटीतून मुंबईत होत होती डिझेलची तस्करी, मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश
- Crime News : कोरोना काळात लावले अनेक बोगस लग्न, राज्यात फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय
-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha