आपापसात दंगली करू नका, मराठा-ओबीसी समाजाने आरक्षणासाठी एकत्र सरकारविरोधात लढावं, प्रकाश आबेडकरांचे आवाहन, "विधानसभेपर्यंत त्यांना विषय झुलवायचाय.."
Prakash Ambedkar on Maratha reservation: आरक्षणाचा प्रश्न सर्वच पक्षांना विधानसभेपर्यंत झुलवायचाय. ओबीसी आणि मराठा समाजाने एकत्र येत आराक्षणासाठी सरकारविरोधात लढावं असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
Nanded News: ओबीसी समाजाला एकत्रित करत असल्याच्या आरोपाखाली नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपापसात दंगली करून काय साध्य होणार? असा सवाल केलाय. मराठा आणि ओबीसी समाजाने आरक्षणासाठी सरकारविरोधात एकत्र लढावं असंही ते म्हणालेत.
आरक्षणाचा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेपर्यंत झुलवत ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्हीही निवडणूकीत सरकारला झुलवत ठेवा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
नांदेडमधील तरुणाला मारहाण
नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यातील अंजनी येथील गोविंद गंधाफुले या तरूणाला मारहाण करण्यात आली . तो ओबीसी समाजाला एकत्रित करत असल्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे . दरम्यान आज जखमी गोविंद गंधाफुले यांची ऍड प्रकाश आंबेडकर यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेतली.
आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा ओबीसी समाजात तेढ
आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण झालं हे बरोबर आहे. पण आरक्षण कोणाला द्यायचं किंवा कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातात आहे. तेव्हा आपसात दंगली करुन काय साध्य होणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय . मराठा आणि ओबीसींने आरक्षणासाठी सरकारविरोधात लढा, दंगली करु नका , आपआपल्या प्रश्नासाठी दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात लढा असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला .
सरकारला आरक्षणाचा प्रश्न विधानसभेपर्यंत झुलवायचाय
आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी आपली भुमिका मांडावी, असं पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहलं. मात्र, कोणत्याच पक्षाने आपली भूमिका मांडली नाही. याचा अर्थ राजकीय पक्षांना आरक्षणाचा प्रश्न विधानसभा निवडणुकीपर्यंत झुलवत ठेवायचा आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळें मतदारांना माझं आवाहन आहे की तूम्हीदेखील निवडणूकीत त्यांना झुलवत ठेवा असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत
जरांगे ७ तारखेला उठतील असं गृहीत धरतो
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ७ तारखेला पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली काढणार आहेत. त्याआधी आजपासून त्यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यात्रा काढत आहेत , उपोषण सुरू करणार असं विचारलं असता , सात तारखेला ते उठतील असं मी गृहीत धरून चालतो असं उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. यावेळी आपल्याला राज्यात मतदारसंघनिहाय तयारी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: