शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीशी अश्लील चाळे ,नायगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल
परीक्षेत चांगले मार्क देतो म्हणून अश्लील चाळे करत होता. सदर बाब पीडित मुलीच्या पालकांना समजल्या नंतर त्यांनी शाळेत जाऊन सदर शिक्षकास चोप दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय
नांदेड : नायगाव तालुक्यातील देगाव येथील साने गुरुजी विद्यालयात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडलीय. या शाळेतील बापूराव मोरे या नराधम शिक्षकाने दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे व मोबाईल वरून अश्लील चॅटिंग करून छेडछाड केलीय. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक बापूराव मोरे याला अटक करून यांच्या विरोधात कुंटूर पोलीसात 354 (ड )12 आयटी 65,अनुसूचित जाती 3 (1)(6)(1)3(6) या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आरोपी शिक्षक हा पीडित मुलीला तुला परीक्षेत चांगले मार्क देतो म्हणून अश्लील चाळे करत होता.सदर बाब पीडित मुलीच्या पालकांना समजल्या नंतर त्यांनी शाळेत जाऊन सदर शिक्षकास चोप दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
नायगाव तालुक्यातील मौजे देगाव येथील पूज्य साने गुरुजी विधालाय या ठिकाणी जानेवारी महिन्या पासून देगावचे सरपंच डॉ दत्ता मोरे यांचे काका बापूराव मोरे या शिक्षकाने एका 10 वी वर्गातील अल्पवयीन दलित मुली सोबत मोबाईल वर रात्री बेरात्री अश्लील मॅसेज टाकून छेड काढलीय. तसेच सदर मुलीला दहावीमध्ये मार्क देतो म्हणून गैरवर्तणूक केली E.अशा प्रकारे अश्लील मॅसेज व सभाषण सदर पीडित मुलीच्या मोबाईल वर केल्याचे निदर्शनास आलंय. त्याच प्रमाणे सदर पीडित मुलीच्या परिवारातील दुसऱ्या मुलीशी ही असेच अश्लिल वर्तन केल्याचे निदर्शनास आलेय. यातील दुसऱ्या मुलीला देगाव ते नांदेड येथे जात असताना,तिच्या मुलीच्या नको त्या ठिकाणी हात लावणे,अश्लील बोलणे असे शिष्य व गुरू यांच्या नात्याला काळिमा फासणारी वर्तणूक गावातील साने गुरुजी शाळेवरील शिक्षक बापूराव मोरे यांनी केलीय.
सदर घटना पीडितेच्या पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या निरदर्शनास आणून देऊन सदरील शिक्षकावर संस्थेच्या वतीने निलंबनाची कारवाई मागणी केलीय. तसेच पोलीस ठाणे कुंटुर येथे पीडित मुलीच्या वडीलांच्या फिर्यादी वरून शिक्षकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.