एक्स्प्लोर

नांदेड हादरलं! कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, शेतात बाभळीच्या झाडाला...

Nanded Farmer sucide: सात दिवसात व्याजासकट कर्ज फेडा अन्यथा कायदेशीर कारवाई करून कर्ज वसूल करू अशी नोटीस आली. नोटीशीवरची रक्कम कशी फेडायची याच्या मानसिक ताणातून शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचचलं आहे.

Nanded: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.   धर्माबाद तालुक्यातल्या पाटोदा (थडी) येथील अल्पभूधारक शेतकरी हरिदास विश्वंभर बोंबले (वय 40) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.  (Farmer Sucide) हरिदास बोंबले यांनी धर्माबाद तालुक्यातील संताजी आंबेकर यांच्या शेतातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शेतात सकाळी स्थानिकांनी त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

शेतीसाठी घेतलेले 1 लाख 83 हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने  बँकेची थकबाकीची नोटीस आली. येत्या सात दिवसात व्याजासकट कर्ज फेडा अन्यथा कायदेशीर कारवाई करून कर्ज वसूल करू अशी नोटीस आल्याने एवढी रक्कम कशी फेडायची याच्या मानसिक ताणावाखाली येऊन शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचचलं आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचं पाऊल

हरिदास हे अल्पभूधारक शेतकरी  होते. आपल्या शेतावर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना मात्र, सततची नापिकी, वाढती उत्पादनखर्च, बाजारातील कमी दर आणि कर्जाचा डोंगर यामुळे ते मानसिक तणावात होते. शेवटी या तणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता बोंबले (वय 38), मुलगा युवराज बोंबले (वय 20) आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. 

या घटनेनंतर सारा गाव हळहळला असून स्थानिक लोकांनी शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी, कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांच्या मुलाचं शिक्षण आणि घराचा आधार टिकावा यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही होत आहे.

बनावट शिक्षक व मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांचा धक्कादायक खुलासा

भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाळा गावातील नानाजी पुंडके शाळेत मुख्याध्यापक म्हणून नेमणूक मिळालेल्या मुख्याध्यापकाने कधीच आमच्या कडे शिक्षक म्हणून नोकरी केलेली नाही. त्यामुळे त्यांचे अनुभवाचे दाखले खोटे असल्याचे संबंधित शाळेने कळवल्यानंतर ही नागपूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्या मुख्याध्यापक विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू असून आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना नागपूर पोलिसांनी काल (11 एप्रिल) रात्री अटक केल्यामुळे शिक्षण विभागात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget