एक्स्प्लोर

नाणारला गावकऱ्यांचं समर्थन, मंत्री आव्हाडांची घेतली भेट, खासदार मुख्यमंत्र्यांना भेटू देत नसल्याचा आरोप

स्थानिक खासदार विनायक राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू देतं नसल्यामुळे नाणारवासीय राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या दारी पोहोचले.सोबतच साडे आठ हजार एकर जमिनीच्या मालकांचे सह्यांचे समर्थनाचे पत्र सादर केलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थानिक खासदार विनायक राऊत भेटू देतं नसल्यामुळे आता नाणार वासियांनी थेट राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आहे. यासोबतच आमचा नाणार प्रकल्पाला विरोध नसून आमचं या प्रकल्पाला समर्थन आहे. यासाठी 13 हजार एकर जमिनीपैकी तब्बल 8 हजार 500 एकर जमिनीचे मालक असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आपल्या सह्यांचे पत्र देखील जितेंद्र आव्हाड यांना सादर केलं आहे.

याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हटले होते की 'मी स्थानिक नागरिकांच्या बाजूने आहे' जर त्यांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर आमचा देखील या प्रकल्पाला विरोध असेल, जर स्थानिकांचा विरोध नसेल तर प्रकल्पावर निश्चित विचार करु. गावकरी म्हणाले की, त्यावेळी राजकारणासाठी स्थानिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम केलं गेलं, चुकीची माहिती पसरवल्या गेल्या. ज्यामध्ये मासेमारी बंद होईल, समुद्रात गरम पाणी सोडलं जाईल, फळ शेती उध्वस्त होईल. आता मात्र आमचे प्रकल्पाबाबतचे सर्व गैरसमज दूर झाले आहेत. त्यामुळे आम्हांला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना विनंती करायची आहे. परंतु स्थानिक खासदार याला विरोध करत असल्यामुळे ते आमची भेट होऊ देतं नाहीत असे धक्कादायक आरोप नाणारवासियांनी केले आहेत.

ॲडव्होकेट शशिकांत सुतार यांचा आरोप केला की, 'लोकांना प्रकल्प हवा आहे. पण स्थानिक खासदार 14 गावांपैकी केवळ 2  गावांसोबत घेऊन या प्रकल्पाला विरोध करत आहेत जे योग्य नाही. आम्हाला मुख्यमंत्री यांच्या समोर स्थानिक लोकांच मत ठेवायचं आहे. पण आम्हाला संधी मिळत नाही. म्हणून आम्ही सरकार मधील इतर पक्षाच्या मंत्र्यांची भेट घेत आहोत. त्यांच्या मदतीने आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमचं निवेदन करणार आहोत, असं सुतार म्हणाले.

नाणार प्रकल्पाबाबत माहिती भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची सौदी अरामको या कंपनीची योजना होती. त्यासाठी मागील भाजप सरकारच्या काळात सुमारे 16 हजार एकर जमीन ताब्यात घेण्याचा निर्णय झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडमध्ये गिर्ये भागात कच्चे तेल उतरवण्यासाठीचे बंदर आणि रत्नागिरीला राजापूर तालुक्यात नाणारजवळील 14 गावांत तेलशुद्धीकरण प्रकल्प अशी एकूण 16  हजार एकर जमीन असे त्याचे स्वरूप होते. या प्रकल्पातून तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येईल आणि एक लाख जणांना रोजगार मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र 2017 मध्ये भूसंपादनाच्या नोटिसा आल्यानंतर स्थानिकांनी विरोध सुरू केल्यावर शिवसेना त्यात उतरली आणि लोकांवर बळजबरी प्रकल्प लादू देणार नाही अशी भूमिका घेतली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यावर भाजपला कोंडीत पकडून भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला होता. यानंतर विधानसभा निवडणुका तोंडावर असताना 2019 च्या जून महिन्यात हा प्रकल्प शेजारच्या रायगड जिल्ह्यात हलवण्याचे संकेत तत्कालीन भाजप सरकारने दिले होते. रायगडमध्ये विरोध नाही त्यामुळे या भागात सिडकोच्या साहाय्याने भूसंपादन करून प्रकल्प उभारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता त्या गोष्टीलाही एक वर्ष उलटून गेले तरी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने काहीही प्रगती झालेली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Thane :ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाडTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 01 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKishor Darade Graduate Election : पदवीधर, शिक्षक मतदार निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Embed widget