एक्स्प्लोर
पक्षानं सांगितलं तर गडकरींविरोधात निवडणूक लढणार – नाना पटोले
‘भाजपनं चॅलेंज केलं होतं की मला लोकसभा आणि विधानसभेत जाऊ देणार नाही, मला रस्त्यावर फिरण्यास भाग पाडतील. आता हे चँलेंज मी स्वीकारतो’ असे म्हणत नाना पटोलेंनी गडकरींविरोधात शड्डू ठोकण्याची तयारी केलीय.
नागपूर : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत. नागपूरमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षानं सांगितलं तर मी गडकरींविरोधात निवडणूक लढणार असल्याचे पटोले म्हणाले. ‘भाजपनं चॅलेंज केलं होतं की मला लोकसभा आणि विधानसभेत जाऊ देणार नाही, मला रस्त्यावर फिरण्यास भाग पाडतील. आता हे चँलेंज मी स्वीकारतो’ असे म्हणत नाना पटोलेंनी गडकरींविरोधात शड्डू ठोकण्याची तयारी केलीय.
नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय आहे. यावरुनच नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी ही लढत प्रतिष्ठेची होणार हे नक्की.
आता काँग्रेसनं नागपूरात नितीन गडकरींची कोंडी कऱण्यासाठी रणनीती आखलीय. खरं तर पटोले यांचा भंडारा-गोंदिया मतदारसंघ आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलाय. त्यामुळेच काँग्रेसने नाना पटोलेंना नागपूरातून उमेदवारी देण्याची तयारी केलीय. 2019 साली नितीन गडकरींची डोकेदुखी वाढणार का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपवर नाराज झालेल्या पटोलेंनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पटोले नेहमीच दिसतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement