एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आत्महत्या नव्हे, जन्मदात्या आईकडून लेकीची गळा दाबून हत्या
नागपूर : नागपुरातल्या एका 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येला धक्कादायक वळण मिळालंय. जन्मदात्या आईनेच लेकीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
नागपूरच्या वाडी परिसरातल्या आंबेडकर नगरात राहणाऱ्या अंकिता मेश्राम या तरुणीनं 14 जुलै रोजी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. घरातच गळफास लावून अंकितानं आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली होती. मात्र ही आत्महत्या नसून तिच्याच जन्मदात्या आईनं केलेली हत्या असल्याचं उघड झालंय.
अंकिताच्या आत्महत्येनंतर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना काही अज्ञात व्यक्तींनी पोलिसांना अंकिताच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिली. पोलिसांनी तातडीनं अंकिताचा मृतदेह ताब्यात घेत तिचं पोस्टमार्टेम केलं आणि त्यात तिची गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालंय.
चौकशीनंतर पोलिसांनी अंकिताची आई मुक्ताबाई मेश्रामला अटक केलीय. अंकिताचं प्रेमप्रकरण असून त्यातून ती गर्भवती राहिल्याचा त्यांना संशय होता आणि याच संशयातून त्यांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचं उघड झालंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement