एक्स्प्लोर

नागपूर हिंसाचार प्रकरण! मृत्यू झालेल्या इरफान अन्सारी प्रकरणात 4 आरोपींना अटक, 2 आरोपी अल्पवयीन 

Nagpur violence case : नागपूर हिंसाचारात मृत्यू पावलेल्या इरफान अन्सारी ( Irfan Ansari ) प्रकरणात नागपूर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

Nagpur violence case : नागपूर हिंसाचारात मृत्यू पावलेल्या इरफान अन्सारी ( Irfan Ansari ) प्रकरणात नागपूर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चार आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त महक स्वामी यांनी दिली आहे. इरफान अन्सारी हा सोमवारच्या रात्रीला इटारसीला जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकाकडे निघाला होता. यावेळी गीतांजली चौकात हिंसाचाराच्या राड्यात तो सापडला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले होते, काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

मृत इरफान अन्सारी  हिंसाचारात सहभागी झाला होता की नाही याचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस उप आयुक्त महक स्वामी यांनी सांगितले आहे. सोमवारी रात्री नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. यामध्ये काहीजण जखमी झाले होते. त्यामध्ये  इरफान अन्सारी हा एक होता. त्याच्या उपचार सुरु होते. मात्र, काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

औरंगजेबच्या कबरीवरून राज्यातील वातावरण गरम

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील (Khultabad) कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली आहे. मराठवाड्यातही (Marathwada) तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसंच 17 मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. त्यानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. नागपूरसह मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक  छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे. या प्रकरणात एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरणी 90 हून अधिक जणांना अटक

नागपूर हिंसाचार प्रकरणी नागपूर पोलिसांचे वेगवेगळे पथक तपासाच्या वेगवेगळ्या दिशेने काम करत आहेत. आतापर्यंत 90 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र दंगलखोर अजूनही लपून बसले आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी नागपूर पोलिसांचा सायबर सेल कामाला लागले आहे. सायबर सेल उपलब्ध सीसीटीव्ही, मोबाईल फुटेज, मीडिया फुटेज, सोशल मीडिया पोस्ट, सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचा डाटा बेस तयार करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर, संवेदनशील भागात पोलिसांचा रुट मार्ट, नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तैणात

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
Embed widget