मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर, संवेदनशील भागात पोलिसांचा रुट मार्ट, नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तैणात
नागपूर (Nagpur) येथील तणावाचा स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) शांतता रहावी या उद्देशाने मुंबई पोलीस (Mumbai Police) अलर्ट मोडवर आले आहेत. संवेदनशील भागात पोलिस रुट मार्च काढत आहेत.

मुंबई : नागपूर (Nagpur) येथील तणावाचा स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) शांतता रहावी या उद्देशाने मुंबई पोलीस (Mumbai Police) अलर्ट मोडवर आले आहेत. मुंबईत ठिकठिकाणी मुंबई पोलीस संवेदनशील विभागात रुट मार्च काढीत आहेत. घाटकोपरच्या चिरागनगर, आझाद नगर, पारशीवाडी विभागात मुंबई पोलिसांच्या वतीने रुट मार्च काढण्यात आला आहे. डीसीपी विजयकांत सागर यांच्या नेतृत्वत अनेक वरिष्ठ अधिकारी या रुट मार्चमध्ये सहभागी झाले होते. मुंबई पोलिसांसह, राज्य राखीव पोलीस, एमएसएफ चे जवान यात सहभागी झाले होते.
नागपूर हिंसाचारानंतर पोलिस प्रशासन सतर्क
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. नागपुरात सोमवारी दोन गटात उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या घटनेने राज्याची उपराजधानी हादरली आहे. शांतताप्रिय अशी ओळख असलेल्या शहरात कधी नव्हे ते ऐवढया मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Nagpur violence) उफाळल्याची घटना घडली असून सध्या या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. सध्या नागपूरमध्ये तणाव पूर्ण शांततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.
औरंगजेबच्या कबरीवरून राज्यातील वातावरण गरम
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील (Khultabad) कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली आहे. मराठवाड्यातही (Marathwada) तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसंच 17 मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. त्यानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. नागपूरसह मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे. या प्रकरणात एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी 90 जणांना अटक
नागपूर हिंसाचार प्रकरणी नागपूर पोलिसांचे वेगवेगळे पथक तपासाच्या वेगवेगळ्या दिशेने काम करत आहेत. आतापर्यंत 90 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र दंगलखोर अजूनही लपून बसले आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी नागपूर पोलिसांचा सायबर सेल कामाला लागले आहे. सायबर सेल उपलब्ध सीसीटीव्ही, मोबाईल फुटेज, मीडिया फुटेज, सोशल मीडिया पोस्ट, सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचा डाटा बेस तयार करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nagpur violence: नागपूर दंगलीबाबत पोलिसांना महत्त्वाचा क्लू सापडला, बांगलादेशमधील फेसबुक अकाऊंटवरुन नेमका काय मेसेज आला?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

