एक्स्प्लोर

Nagpur Audi Car Accident : नागपूर पोलिसांकडून रात्रीच्यावेळी संकेत बावनकुळेंची चौकशी, महत्त्वाची माहिती उघड, नेमकं काय घडलं?

Nagpur Accident : ऑडी कारच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी काल (सोमवारी) रात्री उशिरा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलगा संकेत बावनकुळे याला बोलावून चौकशी केल्याची माहिती पुढे आली आहे.

Nagpur Accident नागपूर: नागपुरात रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या ऑडी कारच्या अपघात प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरच्या रामदासपेठमध्ये घडलेल्या ऑडी कारच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी काल(सोमवारी) रात्री उशिरा भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मुलगा संकेत बावनकुळे याला बोलावून चौकशी केल्याची माहिती पुढे आली आहे.

रविवारच्या मध्यरात्री भरधाव वेगाने धावणाऱ्या एका ऑडी कार ने दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक (Nagpur Accident) दिल्याचे प्रकरण समोर आले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असताना आता या घटनेला राजकीय वळण लागले आहे. अपघातातील ऑडी कार ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या मुलाची असल्याची माहिती पुढे आली आहे. संकेत बावनकुळेच्या मालकीच्या ऑडी कार ने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर ऑडी कार तिथून पळून गेली होती. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानुसार संकेत बावनकुळे त्या वेळेला कार मध्ये नव्हता. तर घटनेच्या वेळेला कार हा अर्जुन हावरे नावाच्या चालक चालवत असून त्याच्यासोबत रोनीत चितंमवार हा त्याचा मित्र बसला होता. पोलिसांनी अपघाताच्या रात्री अर्जुन आणि रोनीत या दोघांची वैद्यकीय चाचणी करत त्यांनी मध्ये प्राशन केलं होतं का? हेही तपासलं होतं.असे असताना आता याचं प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. 

सुषमा अंधारे यांच्याकडून आरोपांच्या फैरी 

नागपुरात पुन्हा घडलेल्या हिट अँड रनच्या अपघातानं राज्य हादरलं असताना हा अपघाताला आता राजकीय वळण लागले आहे. या अपघातात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या मालकीच्या भरधाव ऑडी कारनं धडक दिल्याने महाविकास आघाडीनं भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी अपघात झालेली गाडी माझ्या मुलाचीच असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघात करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.  

सुषमा अंधारे म्हणाल्या की, "नागपुरच्या रामदास पेठ येथे घडलेलं हिट अँड रनचे प्रकरण मधील गाडीचा नंबर पोलिसांनी का नोंदवला नाही? माझा थेट आरोप आहे की,  या गाडीमध्ये संकेत बावनकुळे हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा अपघातावेळी गाडीत होता. तर ही गाडी प्रताप कामगार यांच्या मालकीची असून गाडीचे मालकही ते आहेत. मात्र, अपघाताच्या वेळी पोलिसांनी गाडी नंबर नोंद करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे या प्रकरणात वेगळा न्याय का दिला? गाडी आणि संबंधित लोकांना पोलिसांनी ताब्यात का घेतले नाही? एका नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणि सर्व सामान्यांना वेगळा न्याय का?"

सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी! चंद्रशेखर बावनकुळे 

नागपूर येथे झालेल्या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी स्पष्ट भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली आहे. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. अपघात घटनेतील गाडी माझ्या मुलाच्या नावे असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी तपास करताना सीसीटिव्ही फुटेज तपासावेत, कोणतेही दडपण न ठेवता योग्य कार्यवाही करावी. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, यासाठी मी परमेश्वराचे  आभार मानतो. परंतु या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा 


   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget