एक्स्प्लोर

Nagpur News : खबरदार! रस्त्यांच्या बांधकामावेळी अपघात झाल्यास थेट गुन्हा, नागपूर पोलीस आयुक्तांचा कंत्राटदारांना इशारा

Nagpur News : रस्त्यावरील बांधकामामुळे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहन चालकाचा अपघात किंवा त्यात कुणाचा जीव गेला तर संबंधित कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखल केले जाईल असा इशारा आयुक्तांनी दिलाय.

Nagpur News नागपूर :  रस्त्यावरील बांधकामाच्या वेळेला कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहन चालकाचा अपघात झाला, किंवा त्यात कुणाचा जीव गेला तर संबंधित कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखल केले जातील. असा इशारा नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा कंत्राटदारांना दिला आहे. रस्त्याचे बांधकाम करणारे, उड्डाणपूल बांधणारे, तसेच सार्वजनिक ठिकाणी विविध विकासकामांचे कार्य करत असताना योग्य ती खबरदारी  घ्यावी. या निर्वाधिन कार्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी ही पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल (Dr. Ravinder Kumar Singal)यांनी नागपुरातील कंत्राटदारांना दिली आहे. 

....तर संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

कंत्राटदारांनी निर्माण स्थळी त्यांच्या कामामुळे कोणत्याही वाहन चालकाचा अपघात होणार नाही, वाहन चालक जखमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. बांधकाम स्थळी बांधकामाचे साहित्य व्यवस्थित पद्धतीने ठेवावे. जर कंत्राटदराच्या निष्काळजीपणामुळे नागपुरात कोणत्याही वाहन चालकाचा जीव गेला. तर संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिला आहे. 

नागपुरात दरवर्षी रस्ते अपघातात 300 पेक्षा जास्त वाहनचालकांचा मृत्यू होत आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने अपघात रस्त्यांचा, उड्डाणपुलाचा बांधकाम सुरू असताना त्याच्या अवतीभवतीच्या परिसरात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे मृत्यू थांबवायचे असल्यास कंत्राटदारांनी त्यांची जबाबदारी ओळखणे आणि सुरक्षित पद्धतीने काम करणे आवश्यक असल्याचेही पोलीस आयुक्त म्हणाले.

देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू

नागपुरात 800 ते 1000 लोकांचा दरवर्षी अपघातात मृत्यू होतो. देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू होतो. या अपघातात मृत्यमुखी होणारे 65% मृतक हे 18 ते 34 वयोगटातील आहे. परिणामी, नागपूर शहरात होणारे अपघात आणि या अपघतांसाठी कारण ठरलेले ब्लॅक स्पॉट शोधले आहेत. तसेच त्यावर सध्या काम सुरू असल्याच समाधान केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले होते.

या सोबतच शाळेसमोरील होणारे अपघात रोखण्यासाठीही काम सुरू असल्याचेही गडकरी म्हणाले. तर अतिक्रमणामुळे पायदळ चालणाऱ्यासोबत हिट अँड रन मध्ये मृत्यूचा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे फुटपाथवरील अतिक्रमणवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी स्थानिकांनी केली होती. त्या पाठोपाठ आता  नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल हे देखील रोड अपघातांना घेऊन अॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले असून, आता दोषींवर थेट कारवाईचा बडगा पोलीस उचलणार आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Devendra Fadnavis: गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anis Ahmed : काँग्रेसमधून वंचितमध्ये गेलेले अनिस अहमद पुन्हा स्वगृहीSanjay Raut On Eknath Shinde : बाळासाहेब असते तर दाढी कापून धिंड काढली असतीGopal Shetty Borivali constituency : मी बोरिवलीतून माघार न घेण्यावर ठाम, गोपाळ शेट्टींनी स्पष्ट सांगितलंSada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Devendra Fadnavis: गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Shahu Maharaj : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
Embed widget