Nagpur Lok Sabha 2024 : नितीन गडकरींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ठरला! भव्य रॅलीसह भाजपचे शक्तीप्रदर्शन
Nagpur Lok Sabha 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेमके कधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर गडकरींना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा मुहूर्त मिळाला आहे.
Nagpur News नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Nagpur Lok Sabha Election) भाजपकडून सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नागपुरातनं उमेदवारी मिळाली आहे. नागपूरसह पाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल व्हायला बुधवार 20 मार्चपासून सुरुवात झाली आहे. असे असताना देशभरात लोकप्रिय असलेले नितीन गडकरी नेमके कधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर गडकरींना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा मुहूर्त मिळाला असून येत्या 27 मार्चला नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत स्वत: नितीन गडकरींनी समाज माध्यमांवर माहिती प्रसारित करत या संबंधित माहिती दिली आहे.
भव्य रॅलीतून भाजपचे शक्तिप्रदर्शन
केंद्रीय मंत्री आणि विद्यामन खासदार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपला प्रचाराचा नारळ फोडत स्वत: मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे. ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ म्हणत नागपूर भाजपतर्फे नितीन गडकारींना तिसऱ्यांदा खासदार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यात आता नितीन गडकरी यांनी देखील आपली जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे. अशातच येत्या 27 मार्चला सकाळी 9 वाजता नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या करिता नागपूर भाजप आणि नितीन गडकरींच्या वतीने संविधान चौक से जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात अली असून या रॅलीच्या माध्यमातून नितीन गडकरी आपले शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. या करिता स्वत: नितीन गडकारींनी तमाम नागपूरकरांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास कुणीही उत्सुक नाहीत?
एकीकडे खासदार नितीन गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे नेमका कोणता उमेदवार निवडणुकीत उभा राहणार या बाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. सोबतच गडकारींच्या विरोधात काँग्रेसकडून विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना उमेदवारी मिळाली असल्याचे बोलले जात आहे. मात्र विकास ठाकरे हे स्वतः सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे बघायला मिळत आहे. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये नागपूर लोकसभेसाठी आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाला आहे. मात्र याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. असे असले तरी विकास ठाकरे नागपूरची निवडणूक लढायला फारसे उत्सुक दिसत नाहीये.
इतर महत्वाच्या बातम्या